सामाजिक
शॉर्टसर्किटमुळे लागली पोस्ट ऑफिसला आग
संगणकीय सिस्टिमसह दस्ताऐवज ही जळाले
अमरावती / प्रतिनिधी — स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पोस्ट ऑफिसला भीषण आग लागली. यात
कार्यालयातील सर्व संगणक, फाईल्स, दस्ताऐवज आणि फर्निचर जळाले. हीआगीची घटना गुरुवारी पहाटे ४.४५ वाजता घडली.
पोस्ट ऑफिसमधून धूर निघत असल्याची बाब चौकीदार अनिकेत पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनेची माहिती पोस्ट विभागाच्या
अधिकारी व पोलिस यंत्रणेला दिली. कार्यालयात संगणक, इलेक्टॉनिक यंत्रणा असल्याने आगीने रौद्ररूपधारण केले. याबाबतची माहिती अग्निशामक दलाला मिळताच एकापाठोपाठ एक असे आठ वाहनेपाठविली. आगीवर तीन तासानंतर नियंत्रण मिळविले. घटनास्थळाला
डाक विभाग तसेच पोलिस अधिकारी
यांनी भेट देऊन पाहणी केली. या आगीत ४ ते ५ लाख रूपयांचे नुकसानझाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1