महाशिवरात्री निमित्त ओमशिवेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी….
प.पु महेशगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन संपन्न
जाफराबाद / प्रतिनिधी
जाफराबाद तालुक्यातील बोरगाव मठ येथील ओमशिवेश्वेर महादेव मंदिर महाशिवरात्रीच्या निमित्त भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. महत्वाचं मानलं जाणाऱ्या ओमशिवेश्वर मंदिरात भाविकांची रात्रीपासून अलोट गर्दी पाहायला मिळाली. हर हर महादेवाचा जयोघोष करत भाविकांनी भक्तिभावानं दर्शन घेतलं रात्रीपासूनच शिवभक्तांनी इथं दर्शनासाठी गर्दी केली होती.
दरम्यान, मंदिरात पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.ग्रामीण भागातून आलेले भाविक मिळेल त्या वाहनाने मंदिर परिसरात दाखल झाले. भाविकांच्या गर्दीने ओमशिवेश्वर मंदिराचा परिसर फुलून गेला होता. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थानचे स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. महाशिवरात्री च्या दिवशी भाविकांसाठी चहा,पाणी व ऊसळीचा महाप्रसाद वाटप केला गेला.
ओम शिवेश्वर संस्थान बोरगाव मठ येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी महाशिवरात्री यात्रा महोत्सव निमित्त अखंड हरिनाम व गाथा पारायण सोहळ्याचे मोठ्या भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते.
महाशिवरात्री निमित्त प.पु महेशगिरी महाराज (मठधिपती गौरीशंकर आश्रम) यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले. व नंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी पंचक्रोशीतील असंख्य भाविक भक्त उपस्थित होते.