लग्नाला वर्ष झालं तरी तो जवळ येईना

पत्नी ने घेतली पोलिसात धाव
लग्नांनंतर स्त्री आणि पुरुष दोघांनाही ओढ असते ती मधुचंद्राच्या रात्रीची. पण लग्नानंतर वर्ष उलटून देखील जर पती जवळ येत नसेल तर मग नवरीने काय करावे ? असा प्रश्न अपेक्षीत आहे. पण एक शिक्षक पती लग्नाच्या एक वर्षानंतर सुध्दा पत्नी जवळ घेत नसल्याने पत्नी ने पोलिसात धाव घेतली आहे.
आता प्रकरण पोलिसात गेले आहे. पोलिसांनी मध्यस्थी करत पती-पत्नी आणि दोन्ही बाजुच्या नातेवाईकांना बोलावल्यानंतर खरा प्रकार समोर आला व सर्वांना धक्का बसला. पत्नीने रडत रडत सांगितले की, पतीने लग्नाला एक वर्षे झाले तरी शारीरिक संबंध ठेवले नाहीत. सेक्स काय असतो, याची त्याला माहितीच नाही.
पत्नीच्या या आरोपाचे पतीने खंडन केले नाही. पत्नीने पोलिसांसमोरच याचे कारण पतीला विचारले. ती पतीसोबत राहण्यास तयार आहे. मात्र तिने पतीची तपासणी करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. पत्नी म्हणाली ही तपासणी आवश्यक आहे, जेणेकरून स्पष्ट होईल की, तिला सोबत न ठेवण्याचे कारण शारीरिक कमजोरी आहे की, अन्य काही. पीडितेच्या तक्रारीनुसार गोरखपूर पोलिसांनी हे प्रकरण गुलरिहा पोलिसांना सोपवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅपियरगंज परिसरात राहणाऱ्या तरुणीचा विवाह एका वर्षापूर्वी गुलरिहा परिसरात राहणाऱ्या एका शिक्षकासोबत झाला होता. तिचा पती खासगी शाळेत नोकरीला होता. पत्नीने केलेल्या तक्रारीनुसार लग्नानंतर एक वर्षात तो पत्नीच्या जवळही गेला नाही. यासाठी तो अनेक कारणे देत होता. पत्नीने सेक्ससाठी दबाव बनवल्यानंतर रात्री ११ वाजता तो तिला घेऊन तिच्या माहेरी सोडून आला. जेव्हा घरच्या लोकांनी याबाबत विचारले तेव्हा तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. प्रकरण पोलिसात गेल्यानंतर पति-पत्नीमधील वादाचे हे कारण समोर आले. पती शारीरिक तपासणीसाठी तयार नाही.
कधी एड्स असल्याचे सांगितले तर कधी समलैंगिक म्हटले –
पत्नीने म्हटले की, पतीसोबत जेव्हा कधी सेक्स करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो वेगवेगळी कारणे देत असे. कधी एड्स असल्याचे सांगून भीती घातली. पत्नीने स्वत: नर्सचे शिक्षण घेतले आहे. जेव्हा तिने पतीची शारीरिक तपासणीची मागणी केली तेव्हा तो आपण समलैंगिक असल्याचे सांगू लागला. त्यानंतर तिलाच घरातून हाकलून दिले. पत्नीने म्हटले की, तिला पतीसोबत सुखी वैवाहिक जीवन जगायचे आहे. मात्र पतीने माझ्यावर आरोप केल्याने तपासणी करणे गरजेचे आहे. पोलिसांनी सांगितले की, नियमानुसार पोलीस महिलेची मदत करेल.