क्राइम

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपीसह त्याच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल 

Spread the love

पीडितेचे कुटुंबा कडून फोटो डिलीट करण्याचे आर्जव केले असता 20 लक्ष रुपयांची केली मागणी

 सोलापूर: / नवप्रहार न्यूज नेटवर्क 

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला महाबळेश्वर येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दिला स्वतः सोबत लग्न करण्यास भाग पाडले. पीडितेने हा प्रकार कुटुंबियांना सांगितल्यावर पीडितेचे कुटुंबाने त्याच्या घरी जाऊन फोटो डिलीट करण्याचे आर्जव केले असता मुलाच्या कुटुंबीयांनी पीडितेच्या कुटुंबीयांकडे 20 लक्ष रुपयांची मागणी केली. पीडितेचे तक्रारी वरून तरूणासह त्याच्या कुटुंबातील सहा जणांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपीने पीडितेला डिसेंबर २०२२ मध्ये महाबळेश्वरला नेले. तेथे आरोपी नितीन राजप्पा कटके ( वय २४, बसवेश्वर गल्ली, लातूर) याने तिच्यावर अत्याचार केला. तेथून दुसर्या रिसॉटवर नेऊन अत्याचार करत त्यावेळी त्याने फोटो काढले. त्यानंतर काही दिवसांनी ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी पीडितेला जबरदस्तीने आळंदी येथे नेऊन तिला स्वतासोबत लग्न करण्यास भाग पाडले.

याबाबत पीडितेने कुटुंबियांना सांगितले. पीडितेच्या कुटुंबियांनी आरोपीच्या वडिलाला भेटून अत्याचाराचे फोटो डीलिट करण्यास सांगितल्यानंतर यासाठी २० लाख रूपयांची मागणी केली, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या फिर्यादीवरून नितीन कटके ( वय २४, रा. लातूर), काशीनाथ कटके, निकेतन कटके, रेष्मा कटके ( सर्व रा. पुणे), किसन, ज्योती यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close