लग्ना नंतर एका तासातच वराचा मृत्यू
नेब्रास्का / अमेरिका – नवप्रहार न्यूज नेटवर्क
मृत्यू कधी आणि कसा येईल याचा काही नेम नसतो.तो चोर पावलांनी येतो आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला आपल्या पासून हिरावून नेतो. अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे. वधूच्या मित्रांनी याबाबत माहिती दिली. टॉरेझ डेव्हिस असे वराचे नाव असून, जॉनी मे डेव्हिस वधूचे नाव आहे.
आपली मुले, आपले पालक, कुटुंब आणि मित्रांसमोर टॉरेझ आणि जॉनी मे यांनी उर्वरित आयुष्य एकमेकांसोबत व्यतीत करण्याचे वचन दिले. त्यानंतर थोड्याच वेळात, अचानक टॉरेझ खाली पडला. आजूबाजूच्या लोकांनी ताबडतोब रुग्णवाहिका बोलावली व त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. अशाप्रकारे आयुष्यभराचा उत्सव एका शोकांतिकेमध्ये बदलला. अंत्यसंस्काराच्या खर्चासाठी शुक्रवारी संध्याकाळपर्यंत $12,000 पेक्षा जास्त रक्कम जमा केली. ज्या वधूने तिच्या लग्नाची संपूर्ण तयारी केली होती, तिच्यावर लग्नानंतर अवघ्या काही काळानंतर पतीचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.
वधूच्या मित्रांनी सांगितले की, लग्न समारंभ सुरू झाल्यानंतर एक तासानंतर टॉरेझ डेव्हिसचे हृदय थांबले. त्यानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये त्याचा मृत्यू झाला. माहितीनुसार, टॉरेझ डेव्हिसचा अंत्यसंस्कार 5 जुलै रोजी होईल.