लग्न जुळलेल्या मुलीचे त्याला अन्य युवकाशी बोलणे खटकले आणि त्याचे डोके सटकले
गुना ( मध्यप्रदेश )/ नवप्रहार डेस्क
ज्या तरुणीवर आपले प्रेम आहे. तिने आणि तिच्या घरच्यांनी लग्नास होकार देऊन देखील केवळ ती अन्य तरुणाशी बोलते म्हणून तिला एकट्यात बोलावून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा प्रकार मध्यप्रदेश च्या गुना जिल्ह्यात घडला आहे. मुख्य म्हणजे असे भयानक कामंड करून देखील आरोपी इतरांप्रमाणे बिनधास्त फिरत होता.
हत्या करून प्रेयसीचा मृतदेह आणि तिचे कपडे शेणाच्या गोवऱ्यांमध्ये लपवून ठेवले व फरार झाला. दुसरीकडे युवतीचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी तपास सुरु केला. आरोपी प्रियकर इतका भयंकर गुन्हा करुन लोकांमध्ये अनोळखी बनून फिरत होता. मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली.
गुना जिल्ह्यातील धरनावद पोलीस ठाणे क्षेत्रात येणाऱ्या सुहाया गावात हे भयानक हत्याकांड घडलं. रिंकू लोधा नावाच्या युवकाच शेजारी राहणाऱ्या मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरु होतं. दोघांच्या लग्नाचा प्रस्ताव आल्यानंतर मुलीची आई सुद्धा लग्नासाठी तयार होती. या दरम्यान नको ते घडून गेलं. विवाह बंधनात अडकण्याआधी नाराज रिंकूने युवतीला एकट्यामध्ये भेटण्यासाठी बोलावलं. तिच्यावर बलात्कार केला व तिची निर्घृणपणे हत्या केली.
ते ऐकून सगळेच हैराण
22 एप्रिलला घरातून निघालेली मुलगी घरी पोहोचली नाही, तेव्हा 24 एप्रिलला तिच्या आईने झागर पोलीस चौकीवर जाऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. दुसऱ्याबाजूला हे भयानक हत्याकांड करणारा आरोपी रिंकू लोधा खुलेआम फिरत होता. कोणालाही त्याच्यावर संशय आला नाही. बरेच दिवस मुलीचा शोध लागला नाही, तेव्हा गुनाचे एसपी संजीव कुमार सिन्हा यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर धरनावदा पोलिसांनी संशयाच्या आधारावर रिंकू लोधाची चौकशी सुरु केली. सुरुवातीला रिंकूने पोलिसांना उडवाउडवीची उत्तर दिली. पण पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याने सत्य काय ते सांगितलं. ते ऐकून सगळेच हैराण झाले.
तेव्हा त्याने तिला घराजवळ बनवलेल्या कच्चा घरात बोलावलं
रिंकू लोधाने पोलिसांना जे सांगितलं, त्यानुसार, दोघांमध्ये चांगले प्रेम संबंध होते. त्याला मुलीसोबत लग्न करायच होतं. पण मुलीच अन्य कोणासोबत बोलणं त्याला पसंत नव्हतं. त्यावर तो नाराज व्हायचा. जसे-जसे दिवस पुढे गेले, तशी त्याची नाराजी वाढत गेली. 22 एप्रिलला प्रेयसी घरी होती, तेव्हा त्याने तिला घराजवळ बनवलेल्या कच्चा घरात बोलावलं. तिथे अर्ध्या भागात शेणाच्या गोवऱ्या ठेवलेल्या होत्या. आरोपीने तिथे प्रेयसीवर बलात्कार केला.
फोटो पाहून त्याचा संताप अनावर
त्या पडीक खोलीत दोघेच होते. त्यावेळी रिंकू लोधाने प्रेयसीचा मोबाइल चेक केला. मोबाइलमध्ये प्रेयसीचे अन्य मुलांसोबत फोटो पाहून त्याचा संताप अनावर झाला. त्याने प्रेयसीला विचारलं माझ्याशी लग्न करणार का? तिने होकारार्थी उत्तर दिलं. रिंकूने तिला अन्य मुलांना भेटणं त्यांच्यासोबत बोलणं बंद करण्यास सांगितलं, त्यावेळी तिने नकार दिला. युवतीचा हा नकार रिंकूला पचवता आला नाही. त्याने तिथे पडलेल्या कपड्यानेच तिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेह आणि कपडे शेणाच्या गोवऱ्यामध्ये लपवून पळून गेला.