सामाजिक
जलजिवन योजनेच्या खोदकामामुळे शहरातील रस्ते झाले चिखलमय
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी मागील काही महिन्यांपासून जलजिवन पाणी पाइपलाइन टाकण्याचे काम झाले त्यामुळे घाटंजीतील जवळपास प्रत्येक वार्डातील गल्लीत बोळींत पाइपलाइन टाकण्यासाठी जेसिपीने खोदकाम करण्यात आले मात्र खोदकामा नंतर बऱ्याचशा भागातील खोदलेल्या रस्तावरिल माती व्यवस्थित दबाई न केल्यामुळे व स्थानिक प्रशासनाने यावर कुठलेही लक्ष न पुरवल्याणे दि.२७ व २८ च्या आलेल्या अवकाळी पावसामुळे संपुर्ण घाटंजी- घाटी शहरातील रस्त्यांवर चिखल झाल्याचे दिसून येते आहे त्याचा परिणाम जाणार येणाऱ्या नागरिकांना आपली दुचाकी त सोडाच पण पायदळ चालतांनही कसरत करावी लागत असून या बोगस कामामुळे व प्रशासकाच्या दूर्लक्षीत धोरणामुळे घसरुन पडण्याची वेळ आल्याने नागरिकांत कामगार ठेकेदार व स्थानिक प्रशासक यांचेवर रोक्ष व्यग्त होत आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
1
+1