लग्नाचे आमिष दाखवून केले गर्भवती ; बाळाच्या संगोपणासाठी ती उतरली देहविक्रीत

नागपूर / विशेष प्रतिनिधी
अल्पवयीन असलेल्या तिला सर्वेश सुशील रामटेके याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाच्या आणाभाका देत तिच्यावर अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहिली. तिने त्याला त्या बद्दल माहिती देत लग्नाची गळ घातली. पण त्याने सरळ नकार दिला. त्यामुळे तिने मूल जन्माला घालण्याचा निश्चय केला. मूळ4 जन्माला घातल्यावर त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे ती देहविक्रीच्या व्यवसायात घुसली.
महिन्याभरापूर्वी सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने खरबीतील मैत्री विहारनगर परिसरात छापा टाकून देहव्यापार उघडकीस आणला. या कारवाईत पथकाने दोन अल्पवयीन मुलीची सुटका करीत, ऐश्वर्या उर्फ आशू गजानन राऊत (वय २१) हिला अटक केली होती.
दरम्यान नंदनवन पोलिसांनी या मुलींची साक्ष नोंदविली असता, त्यातील एका मुलीने आपली आपबिती सांगितली. त्यात तिची सर्वेश सोबत ओळख झाली. याशिवाय मैत्रीतून प्रेम फुलले. त्यातून त्याने तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसात ती गर्भवती झाल्याने तिने लग्नाची गळ घातल्यावर त्याने नकार दिला, त्यानंतर तिने मुल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला. त्याचे पालनपोषण करण्यासाठी ती देहव्यवसायात आल्याची माहिती समोर आली.
काही दिवसांपूर्वी हा गुन्हा अजनी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांच्या नेतृत्वात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सर्वेशला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची तीन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली असून पोलिस तपास करीत आहेत.