लग्नमंडपातच दोन्ही पक्षांची फ्री स्टाईल

मिळेल त्या वस्तू एकमेकांवर भिरकावल्या
फिरोजाबाद / नवप्रहार डेस्क
लग्नात एखाद्या गोष्टीवरून कधी भडका उडेल आणि त्याचे रूपांतर हाणामारीत होईल याचा काही नेम नसतो. कधी वरातीचे आवभगत योग्य केला नाही. कधी जेवण व्यवस्थित नव्हते तर कधी जेवण कमी गेले म्हणून हाणामारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. लग्नात वऱ्हाडी आणि मुलीकडील लोकांत फ्री स्टाईल झाल्याची घटना उत्तरप्रदेश च्या फिरोजाबाद मध्ये घडली आहे.
यावर समजून घेणारी माणसं असतील तर ठीक. नाही तर यामुळे दोन्ही कुटुंबामध्ये वाद होण्यास सुरुवात होते.पण, आज व्हायरल व्हिडीओत काही तरी वेगळंच पाहायला मिळालं आहे. अन्न अपुरं पडलं म्हणून दोन कुटुंबामध्ये जोरदार भांडण झालं आणि हे भांडण खुर्च्या फेकण्यापर्यंत पोहचलं.
व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशचा आहे. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे नुकताच एक लग्नसमारंभ पार पडला. लग्नसमारंभ सुरळीत सुरू होता, पण काही वेळात जेव्हा भोजन समारंभ सुरू झाला, तेव्हा मात्र जेवणाच्या कमतरतेमुळे नवरा आणि नवरी यांच्या कुटुंबांमध्ये जोरदार भांडण सुरू झालं. तसेच हे भांडण साधसूधं नसून कोणी लाठ्या, तर कोणी खुर्च्या मारण्यास सुरुवात करू लागलं आणि लग्नाला एक नाट्यमय वळण आलं. नक्की काय घडलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, अनेक पुरुष एकमेकांवर खुर्च्या फेकून मारताना दिसत आहेत. लग्नात जेवणाच्या टंचाईमुळे एवढी तीव्र हाणामारी झाली की अनेक उपस्थितांना किरकोळ दुखापत झाली. नवरीच्या कुटुंबाने आरोप केला आहे की, नवऱ्याच्या कुटुंबाने अन्नाच्या कमतरतेमुळे नवरीच्या कुटुंबाकडे पैशांची मागणी केली. काही पैसे देऊनही नवऱ्याच्या कुटुंबाने आणखीन एक लाख रुपये मागितले, ज्यामुळे भांडण पेटले आणि मग खुर्च्या फेकून सर्व जण एकमेकांना मारू लागले.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच सांगण्यात येत आहे की, परिस्थिती एवढी बिघडली की, लग्न रद्द करण्यात आले. नवरीच्या कुटुंबाने लग्नाच्या पैशांची देवाणघेवाण न करता तिला घरी नेले आणि समारंभाचा दुःखद अंत झाला. या व्हायरल व्हिडीओने उत्तर प्रदेश पोलिसांचेही लक्ष वेधून घेतले आहे. ‘या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीच्या आधारे संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून लाइनपार पोलिस ठाणे पुढील कायदेशीर कारवाई करत आहे’, अशी कमेंट पोलिसांनी केली आहे.