क्राइम
लाच मागणारे मंडळ कृषी अधिकारी एसीबी च्या जाळ्यात
मोर्शी / प्रतिनिधी
शेतकऱ्याला संत्रा बागेचे अनुदान मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी करणारा मंडळ कृषी लाच स्वीकारताना एसीबी च्या जाळ्यात अलगद सापडला आहे.
थोडक्यात हकिकत यातील तक्रारदार यांनी दिनांक २०/०३/२०२४ रोजी तकार दिली की, तक्रारदार यानी कृषी विभागाचे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत शेतातील संत्राबागेची पुर्नजिवनकरीता मिळणाऱ्या अनुदानासाठी कृषी विभागाच्या महाडीबीटी ऑनलाईन प्रणालीवरुन नोव्हेंबर २०२३ मध्ये अर्ज सादर केला होता. त्यानंतर त्यासंबंधाने तक्रारदार हे तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मोर्शी येथील मंडळ कृषी अधिकारी श्री पांडुरंग मस्के साहेब यांना भेटले असता त्यांनी तक्रारदार यांना “सदर योजनेमध्ये तुम्हाला लाभ मिळू शकत नाही. तरी सुध्दा मी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळून देतो. सदर योजनेचे अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या अनुदानापैकी ५०टक्के रक्कम मला मोबदला म्हणून दयावी लागेल “असे म्हणून लाचेची मागणी करीत असल्याबाबत
तकार दिली. सदर तकारीच्या अनुषंगाने दि.२१/०३/२०२४ रोजी पचासमक्ष केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान मंडळ कृषी अधिकारी श्री पांडुरंग मस्के यांनी तकारदार यांचे बैंक खातेवर जमा झालेल्या अनुदानापैकी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली तडजोडीअंती १३,०००/- रु. लाचेची मागणी करुन लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले वरुन दिनांक २१/०३/२०२४ रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान मंडळ कृषी अधिकारी श्री. पांडुरंग नामदेव मस्के, पद मंडळ कृषी अधिकारी यांनी तकारदार यांचेकडून लाचेची रक्कम १३,०००/- रु. पंचासमक्ष स्विकारली वरुन आज रोजी वर नमुद आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचेविरुध्द पो.स्टे. मोर्शी जि. अमरावती ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कार्यवाही मा.श्री. मारुती जगताप, पोलीस अधीक्षक, श्री अनिल पवार, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, श्री. मिलींदकुमार बहाकर, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि अमरावती, यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. योगेशकुमार ददे, पो.नि.शिल्पा भरडे, पो.कॉ. आशिष जांभोळे, पो.कॉ. शैलेश कडू, पो.कॉ उपेंद्र थोरात, चालक पो. उपनि किटुकले यांनी पार पाडली.