अंजनगाव सुर्जी येथील नवीन प्लॉट भागात कुत्रीम पाणीटंचाई
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी शहरात २०१९ मध्ये शहरातील निर्माण होणारी कृत्रिम पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियान अंतर्गत शासनाच्या नगर विकास विभागामार्फत साडेसहा कोटी रुपयाची नगरोत्थान योजना मंजूर करण्यात आली ती ।नागरपरिषेदेच्या माध्यमातून सदरची योजना ही जीवन प्राधिकरणाचे अखत्यारीत देण्यात आली होती परंतु कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा व अधिकाऱ्यांच्या कमिशनखोरीमुळे या योजनेचा बोजवारा उडाला पंधरा महिन्याच्या कामाला तब्बल साडेतीन वर्ष होत असताना केवळ दोन टाक्या बाधण्यापलीकडे कुठलेही काम पूर्ण झाले नाही शहरातील आवश्यकता असलेल्या वाढीव हद्दीतील भागात जल वाहिन्या टाकल्या गेल्या नाहीत त्यामुळे अनेक भागातील नागरिकांना बोअर चे पाणी प्यावे लागत आहे शहरातील वाढीव हद्दीतील भाग असलेल्या अंबिका नगर,गंगोत्री नगर, पुर्वा नगर,यश नगर येथील
चंचल लोणकर,ज्योती मुरतकर, छाया रेखाते,शारदा ठाकरे,सुनंदा पाचडे,ललिता नरोडे,मयुरी कापले ,ममता वणकर,हेमलता तायडे, आशा धुळे,सुमन शेरकार,पुष्पा सोनपरोते, स्वाती उमाळे,ज्योती माहुरे,उज्वला पाटील,मेघा होटे,कुमुद देशमुख,तेजस्विनी मंडवे,श्रुती कपले यांच्यासह योगेश मंडवे,विजय कपले,मधुकर कपले,देविदास पाटील,मनीष दुधे,श्रीकृष्ण दुधे,सागर कपले,हेमंत चीलात्रे,ज्ञानेश्वर देशमुख,गजानन रेखाते यांनी
स्थानिक पालिकेत नुकतेच रुजू झालेले मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांच्या दालनात धडक दिली तेव्हा मी नवीन आलो अहो याबाबत कंत्राटदाराला तातडीने सूचना देऊन चार दिवसात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केल्या जाईल असे आश्वासन दिल्याने महिला शांत झाल्या व सदरचे काम मी लवकरच पूर्ण करून देतो असे आश्वासन दिले