क्राइम

कुठे चाललाय महाराष्ट्र आपला , पुण्यात घडले भयानक कांड 

Spread the love
हत्येचा व्हिडीओ स्टेटस वर ठेवला 
पुणे / प्रतिनिधी
             विद्यानगरी म्हणून प्रसिद्ध असलेले पुणे शहराची ओळख आता क्राईम नागरी म्हणून होत चालली आहे. येथे हत्या, बलात्कार ,विनयभंग यासारख्या गोष्टी लागोपाठ घडत आहेत. नुकत्याच चाकण मध्ये घडलेल्या एका घटनेने कुठे चाललाय महाराष्ट्र माझा असा प्रश्न  निर्माण होत आहे.
 चाकणमध्ये अल्पवयीन मुलांनी मिळून अल्पवयीन मित्राचीच हत्या केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. चाकणमधील एका रिकाम्या प्लॉटमध्ये ही घटना सोमवारच्या रात्री घडली आहे.

शाब्दिक चकमकीतून सुरू झालेला वादाचे पडसाद थेट हत्येत उमटले आहेत. मृत अल्पवयीन मुलावर चार महिन्यांपूर्वीच हत्येचा गुन्हा दाखल आहे. तर हत्या करणाऱ्यांपैकी एकावर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.

चाकण पोलिसांनी मुख्य आरोपीसह अल्पवयीन मित्राला ताब्यात घेतलेलं आहे. मृत मुलगा, मुख्य आरोपी अन तिसरा साथीदार तिघे मद्यपान करत होते. त्यावेळी मृत मुलात आणि तिसऱ्या मित्रात शाब्दिक चकमक झाली. यातून मृत मुलाने त्याच्या कानशिलात लगावली. हे पाहून मुख्य आरोपी संतापला आणि त्याने मृतकाला दगडाने ठेचल्याची माहिती समोर आलीये.

हत्येचा व्हिडीओ स्टेट्सवर

या घटनेच्या व्हिडीओ इन्स्टाग्रामवर स्टेट्स ठेवण्याची हिंमत आरोपींनी दाखवली. या प्रकरणी चाकण पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या हत्याप्रकरणातील आरोपी 17 वर्षीय आहेत.

या हत्येचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अल्पवयीन मुलांमधील ही क्रूरता पाहून पिंपरी चिंचवड पोलिसांना धक्का बसला आहे.

दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. पुणे पोलिसांकडून ही गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु त्यानंतरही कोयते हल्ले, रस्त्यांवर हल्ले, चोरी, दरोडो आणि मारहाण असे प्रकार घडत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close