तळेगाव दशासर पोलिसांच्या कारवाईत 1 लाखाचा गांजा जप्त
धामणगाव रेल्वे / हितेश गोरिया
पुढे येणारे सण- उत्सव बघता या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्ह्यातील ठाणेदारांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे बजावले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन तळेगाव दशासर हद्दीतील ग्राम सुलतानपुर येथे पो.हे.कॉ. गजेन्द्र ठाकरे व.नं. २७ पो.स्टे. तळेगाव द यांना गोपनिय माहीती मिळाली की, आरोपी नामे चंदु शेखुलाल मोहीते हा त्याचे घरी गांजा विक्री करीता बाळगून आहे अशा माहीती वरून स. पो. नि श्री. रामेश्वर धोंडगे, ठाणेदार पो.स्टे. तळेगाव यांना देवून सपोनि श्री. रामेश्वर धोंडगे यांनी सदरची माहीती वरीष्ठांना देवून रेड करणेकामी सर्व वाविची पुर्तता करून त्यांचे पोलीस स्टाफसह ग्राम सुलतानपुर येथे नमुद आरोपी चे घरी गेले असता चंदु शेखुलाल मोहीते हा पोलीसांना पाहून पळुन गेला त्याच्या घराची कायदेशिररित्या घरझडती घेतली असता आलमारीच्या मधल्या कप्यात दोन पार्सल टेप पटीने गुंडाळलेले दिसुन आले. त्याची पाहणी केली असता त्यामध्ये हिरवट रंगाचे ओलसर अर्धवट वाळलेले हिरव्या पत्ती कळी फुले तथा बिया असलेल्या दिसल्या त्याचा उग्र वास येत असल्याचे दिसून आले आरोपी क्र.१ होला विचारले असता तिने तो गांजा (अंमली पदार्थ) असल्याबाबत सांगितले. सदर गांजाचे वजन केले एकूण ४.४२० कि.ग्रा. किंमत १०००००/- रुचा मिळुन आल्याने जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्र.३ फरार असून शोध घेवून अटक करण्यात येते.
सदरची कारवाई श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. श्री. शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती प्रा. श्री. सचिन्द्र शिंदे उप-विभागीय पोलीस अधिकारी, चांदुर रेल्वे श्री. यांचे मार्गदर्शनात श्री. रामेश्वर धोंडगे, ठाणेदार पो.स्टे. तळेगांव यांचे नेतृत्वात पो.उप.नि. कपिल मिश्रा, अंमलदार गजेन्द्र ठाकरे, मनिष आंधळे, विजयसिंग बघेल, विनोद राठोड, संदेश चव्हाण, पवन अलोणे, श्याम गावंडे, अमर काळे, महौला अमलदार भाग्यश्री काळमेघ, सिमा कोकणे.. भागयश्री उमाळे, कांचन दहाटे यांचे पथकाने केली आहे.