कु.प्राची रामटेकेचे निट परिक्षेत घवघवीत यश
घाटंजी तालुका प्रतिनिधी – सचिन कर्णेवार
नुकतेच निट परिक्षेत घाटंजीतील नेहरु नगर रहिवासी व सर्व परिचित असलेले बांधकाम विभाग पांढरकवडा येथे आरेखक पदावर कार्यरत असलेले प्रदीप रामटेके यांची सुकन्या प्राची हीने निट परिक्षेत ७२० पैकी ५६१ गुण मिळवून(97.26 परशेन्टाईल स्कोर ) घेत घवघवीत यश संपादन केले. मुळात हूशार व तलक्क बूध्दी असलेली प्राची हीने इयत्ता 10 वी शि.प्र.म.इंग्रजी माध्यम शाळा घाटंजी त प्राप्त गूण-98.60 टक्केवारी तसेच इयत्ता 12वी सेटं पाऊल सायन्स जुनियर काॅलेज नागपूर- प्राप्त गूण-82.33 टक्केवारी तर,
वैधकीय अभ्यासक्रम पात्रता निट परिक्षेत 720पैकी 561गुण घेत संपूर्ण भारतातून अनुसूचित जातीतील प्रवर्गातून 1434 वा क्रमांक पटकाविला आहे. एवढंच नाही तर सतत आपले लक्ष अभ्यासात केंद्रीत करुन अभ्यासा सोबत एमएच-सिईटी परिक्षेत प्राप्त गुण-99.62 परशेन्टाईल स्कोअर सहजच म्हणून दिलेल्या अभियांत्रिकी पात्रता – जेईई (मेन) परिक्षेत प्राप्तगूण-92.87
परशेन्टाईल स्कोअर मिळविले. आपल्या शिक्षणाच्या वयात विद्यार्थी वर्गाणी केवळ शिक्षण व शिक्षणाचं लक्ष ठेवत आपले आई- वडील यांचे स्वप्न पुर्ण करायला हवे असे मत तिने प्रसिध्दी माध्यमांच्या समोर व्यक्त केले.आपल्या यशाचे श्रेय तीने आई- वडील वैशाली प्रदिप पुंडलिकराव रामटेके भाऊ पीयुष आय टी इंजिनिअर, व गुरुजनांना दीले आहे.उच्च पदावर कार्यरत होऊन समाजासाठी काहीतरी करणे हे लक्ष असल्याचे तिने सांगितले आहे.