सामाजिक

कृषिरत्न प्रवीण कुंडलकर सन्मानित.

Spread the love

 

वरूड/तूषार अकर्ते

वरुड शहरातील संत नगाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व वरुड नगरपरिषदेच्या वतीने साई मंदिर परिसरातील संत नगाजी महाराज समाजभवनाचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. या वेळी स्पर्धा परीक्षेमधे प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. या अनुषंगाने कृषी क्षेत्रामध्ये भरभरून कार्य करणारे किसान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण कुंडलकर (कृषिरत्न ) यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला आहे. त्यांनी पाणी परीक्षण व माती परीक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणारे व रासायनिक शेती, जैविक शेती व पारंपरिक शेती करण्याकरिता मार्गदर्शन करणारे किसान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण कुंडलकर यांना आतापर्यंत विविध सामाजिक संघटनेचे विविध पुरस्कार प्राप्त झाले असून २०२० मध्ये कृषिरत्न पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना येत्या काही महिन्यांमध्ये इंटरनॅशनल पुरस्कार सुद्धा मिळणार आहे अशी माहिती समोर आली आहे.अशा व्यक्तींचा संत नगाजी महाराज समाज भवनाच्या लोकाअर्पण सोहळ्यामध्ये नाभिक समाज बांधव व संत नगाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने आमदार देवेंद्र भुयार, मुख्याधिकारी प्रविण मानकर, डॉ. आंडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. कृषी रत्न प्रवीण कुंडलकर यांचा सन्मान झाल्यामुळे किसान फाउंडेशनने संत नगाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व वरुड नगर परिषद आभार मानले या कार्यक्रमाचे संचालन राजिव बाभुळकर यांनी केले आहे. प्रास्ताविक प्रविण सावरकर यांनी केले तर आधार प्रदर्शन सौ वर्षा महेन्द्र तळखंडकर यांनी केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close