बालसुधार गृहात मुलींवर समलैंगिक अत्याचार ?

पूणे / नवप्रहार डेस्क
अनाथ, निराधार, निराश्रित ,विधी संघर्षितआणि पीडित मुलींना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून याठीकानी ठेवण्यात येते. परंतु येथे मुलींवर समलैंगिक अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा अजब प्रकार मुंढवा येथील बालसुधार गृहात घडला आहे. या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावरून संस्थेच्या अधिपरिचारिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोनिका सुर्यकांत रंधवे (वय 38, रा. ओ कोनार्क विहार, धनकवडी, पुणे) यांनी तक्रार दाखल केली होती .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका रंधवे या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (अतिरीक्त कार्यभार) म्हणून काम करत आहेत. रंधवे यांना मुस्कान संस्थेच्या महिला कर्मचाऱ्यांनी मुंढवा येथील शासकीय मुलींच्या बालगृहात संस्थेतील प्रवेशितांकडून लैंगिक अत्याचार होत आहेत. अशी तक्रार दिली 11 सप्टेंबरला 2024 दिली होती. मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मोनिका रंधवे यांनी किरण वैज्यनाथ वाहूळे, कांचन पाटील व नुतन देवकर या तिघांची समिती स्थापन तयार करून चौकशीचे आदेश दिले.
त्यानंतर समितीने तत्काळ संस्थेस भेट देऊन प्रवेशितांकडे चौकशी केली. तेव्हा एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने सांगितले की, येरवडा येथील बालकल्याण समीतीच्या आदेशाने सुरक्षिततेकामी २ जूनला या संस्थेत दाखल करण्यात आले आहे. जुलै 2024 ते 11 सप्टेंबर या कालावधीत अल्पवयीन मुलीला संस्थेमधील एक अधिपरिचारिका म्हणाली “तु लेस्बियन आहे. इतर लेस्बियन करतात तसे मुलींसोबत समलैगिक संबंध ठेव. असे वारंवार म्हणुन जबरदस्ती करीत होत्या. तसेच एकदा छातीमध्ये दुखत असल्यामुळे संस्थेच्या अधिपरिचारिकेकडे दाखवण्याकरीता गेली होती. तेव्हा तिने चुकीचा स्पर्श करून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. असे अल्पवयीन मुलींने सांगीतले.
दरम्यान, समितीने केलेल्या प्रथमदर्शनी चौकशीअंती निदर्शनास आले की, अधिपरिचारिका यांनी प्रवेशितासोबत संस्थेमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे दिसून येत आहे. अशी फिर्याद जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संस्थेच्या अधिपरिचारिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक गैरप्रकार उघडण्याची शक्यता?
मुंढवा येथील शासकीय निरिक्षणगृह/विशेषगृह/बालगृहात १६ वर्षीय मुलीवर संस्थेच्या अधिपरिचारिकेनेच वेळोवेळी समलैगिक संबंध ठेव म्हणून अल्पवयीन मुलीला जबरदस्ती केल्याचा एक प्रकार समोर आला आहे. इतर लेस्बियन करतात तसे मुलींसोबत समलैगिक संबंध ठेव. असे अधिपरिचारिकेने पीडीतेला सांगितले होते. त्यामुळे या संस्थेमध्ये अनेक मुलींसोबत असे प्रकार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.