मणिपुर येथील महीलां भगिनींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काँग्रेस चा धडक मोर्चा
राळेगाव / संजय कारवटकर
मणिपुर येथील दोन महीला भगिनींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस कमेटीचे राळेगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा म.रा.माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके ,प्रफुलभाऊ मानकर अध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटी यांच्या नेतृत्वात आज उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन भाजप सरकारच्या विरोधात उपविभागीय अधिकारी मेघना कवाली यांना दिले निवेदन. मणिपुर येथील महीलांवर अत्याचार करणाऱ्यांवर भाजप सरकारने कोणतेही कारवाई केली नाही. आणि मणिपुर घटनेच्या संदर्भांमध्ये भाजप सरकार बोलायला पण तयार नाही अश्या सर्वसामान्यावर महीलांनावर अत्याचार करणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीपण बोलायला तयार नाही .अश्या मुजोर,डाकु अत्माचारी,जनतेची दिशाभुल करणाऱ्या गुंडेगिरी प्रवृतिच्या सरकारचे करायचे काय खाली डोके वरती पाय असे केल्याशिवाय या डोळेबंद करुन असलेल्या भाजप सरकारचें डोळे उघडणार नाही.भाजप सरकार हे सर्वसामान्यावर अत्याचार करीत आहे .असे त्यांनी मनोगत व्यक्त करुन मणिपुर येथील महीला भगिनींवर अत्याचाकरुन नग्न धिंड काढलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करुन भाजप सरकारवर हल्लाबोल केले आहे. यावेळी प्रवीन देशमुख,वंदनाताई आवारी, यांनी पण मणिपुर येथील महीला भगिनींवर अत्याचार झालेल्या घटनेचा निषेध करीत भाजप सरकारच्या विरोधात तिव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी अरविंद वाढोणकर अध्यक्ष ओ. बि.सी.सेल यवतमाळ ,राजेंद्र तेलंगे अध्यक्ष राळेगाव तालुका काँग्रेस कमेटी, प्रदीप ठुणे अध्यक्ष राळेगाव शहर काँग्रेस कमेटी, वंदनाताई आवारी अध्यक्ष यवतमाळ जिल्हा महीला कांग्रेस, प्रविनभाऊ देशमुख ,महादेवराव काळे, मिलिंद इंगोले अध्यक्ष ख.वि.स.राळेगाव,रविन्द्र शेराम नगराध्यक्ष राळेगाव ,जानराव गिरी उपनगराध्यक्ष न.पं.राळेगाव,वर्षाताई तेलंगे,राउत ताई,कोपरकर ताई,राहुल होले,नंदुशेट गांधी,गजानन ठाकरे,राजु ठाकरे,भारत पाल,अंकुशभाऊ मुनेश्वर,राजेंद्रप्रसाद ओकार,केंठे साहेब,अंकुशभाऊ रोहणकर,वसंतराव मोहीते,संजय देशमुख,आषिष कोल्हे,मनोज मानकर,प्रकाश पोपट,राऊत सर,गणेश कुडमथे,बंडु लोहकरे,राजु दूधपोळे,श्रीदर थुटुरकर सुरेश पेंदाम,आनंदराव बोंदरे,रविद्र खारकर,गजानन ठाकरे,अजय जुमनाके व हजारोच्या संखेने तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.