आध्यात्मिक

ज्ञानदीप कोचिंग क्लासेस मधील गणरायाला मोठ्या उत्साहात निरोप…

Spread the love

हिमायतनगर ,,/ प्रतिनिधी

हिमायतनगर शहरांमध्ये नव्याने अलौकिक मिळालेले ज्ञानदीप कोचिंग क्लासेस मध्ये विविध शालेय शैक्षणिक स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात तसेच विविध सामाजिक उपक्रमही मोठ्या प्रमाणात राबवली जातात.

त्याचप्रमाणे गणरायाच्या आगमनापासून ते निरोप देण्यापूर्वी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, आशा प्रकारच्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

गणरायाच्या आगमनापासून ते निरूपापर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी नित्यनेमान दररोज गणरायाची पूजा व खूप आनंदमय वातावरणात केली, निरोप प्रसंगी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जेघोष विद्यार्थ्याकडून निघाला.त्याचप्रमाणे गणरायालाही निरोप देण्यापूर्वी बाल गोपाला सहित मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पालकांनाही व समाजातील इतर सर्व घटकातील व्यक्तीने महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात आस्वाद घेतला.

यावेळी उपस्थित ज्ञानदीप कोचिंग क्लासेस संचालक डि.एन. गुंडेकर सर,श्रीनिवास होळकर सर, विजय वाठोरे सर तसेच पालक वर्ग बाबुराव बनसोडे, संदीप दुथाडे, संजय देवतळे, लोकस्वराज्य आंदोलन जिल्हाध्यक्ष धोंडोपंत बनसोडे, सोहम राठोड, तपासकर भाऊ, जेम्स सर, शोभित सर, उत्तम नाईक सर महाराष्ट्र पर्व लाईव्ह चे मुख्य संपादक गंगाधर गायकवाड, रिपब्लिक 24 न्यूज चॅनलचे संपादक प्रशांत राहुलवाड, बालाजी अनगुलवार बाळु हाळदे,राम चिंतलवाड इत्यादी. उपस्थित होते.

तसेच गणरायाला निरोप देण्यासाठी विद्यार्थी बालगोपाल मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, अशाप्रकारे मोठ्या उत्साहात गणरायाला निरोप देण्यात आला,

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close