Uncategorized

हत्येला सर्पदंश भासवण्याघ त्यांचा प्लान फसला

Spread the love

प्रेयसी आजी प्रियकराला हत्येघा आरोपाखाली अटक 

मेरठ / नवप्रहार मिडिया 

                अनैतिक संबंधात वेडे झालेले लोक आपले प्रेम मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होतात.  त्यांना जराही चिंता नसते  की आपला प्लान उघड झाला तर आपण त्यात फसू शकतो. आणिअग आपल्याला तुरुंगाची हवा खावी लागू शकते.आणि त्यात आपल्या सोबत आपल्या कुटुंबाचे भविष्य अंधकारमय होऊ शकते. प्रेयसीने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता आपल्या प्रियकरासोबत पतीची हत्या केली आहे. आणिन्य हत्येला सर्पदंश भागवण्यासाठी त्याच्या मृतदेहाला  सपाकडून १० वेळा चावा घ्यायला लावला. आणि मृतदेह असलेल्या पलंगाखाली साप आणून ठेवला. पण …..

 

अमित असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. अमितची पत्नी रविताने पतीच्या हत्येमागचं कारण सांगितल्यावर पोलिसांनाही हादरा बसला. पतीच्या हत्येसाठी मोठा कट रचल्याची माहितीही रवितानो पोलिसांना दिली.

पतीची हत्या केल्यानंतर रविताने पोलिसांना जबाब देताना सांगितलं, माझा पती माझ्यासोबत दररोज भांडण करायचा. मला मारायचा. मला शिविगाळ करायचा. माझ्याशी अश्लील बोलायचा. तुला वेश्या बनवून धंदा सुरु करेन, अशाप्रकारच्या धमक्याही मला द्यायचा. या सर्व प्रकारामुळे मी खूप नैराश्यात गेली होती. त्यानंतर मी माझा प्रियकर अमरला हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर त्याने मला पतीची हत्या करण्यासाठी सांगितलं. मी त्याला मारेन, तू मला साथ दे, असं तो मला सांगायचा. माझा पती माझ्यासोबत हिंसक पद्धतीने वागायचा आणि माझा अपमानही करायचा. याच गोष्टीला कंटाळून मी माझ्या प्रियकराच्या मदतीने अमितच्या हत्येचा कट रचला.

पत्नीने पतीची कशी केली हत्या?

मी माझ्या पतीचं तोंड आणि हात पकडलं. त्यानंतर माझा प्रियकर अमरने माझ्या पतीचा गळा दाबून हत्या केली. दरम्यान, अमितचा खून करण्यात प्रियकर अमरला मदत केल्याचं रविताने कबूल केलं. अमितच्या हत्येच्या वेळी त्यांचं तोंड दाबून हात पकडलं, जेणेकरून त्याचा ओरडण्याचा आवाज येणार नाही, अशी माहितीही रविताने पोलिसांना दिली.

मृतदेहाजवळ साप कुठून आला?

“साप कुठून आणला याबाबत मला माहित नाही. अमरने साप आणला असेल आणि बेडखाली मृतदेहाच्या बाजूला ठेवला. जेणेकरून असं वाटेल की सर्पदंशाने अमितचा मृत्यू झाला. हत्येच्या घटनेनंतर असा प्लॅन केला की, ही हत्या नैसर्गिक मृत्यू वाटेल. यासाठी सापाला मृतदेहाच्या बाजूला सोडलं”, अशी माहिती रविताने पोलिसांना दिली. परंतु, अमितचा गळा दाबून खून करण्यात आल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं. त्यानंतर रविता आणि अमरने गुन्ह्याची कबुली दिली.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close