किळसवाणा प्रकार … महिलांना मानवी मूत्र पाजले
वसई / विशेष प्रतिनिधी
काही लोक विकृत मानसिकतेचे असतात. दुसऱ्यांच्या भावनांशी खेळणे आणि त्यांना मानसिक त्रास देणे यात त्यांना असुरी आनंद येतो. अत्यंत लाजिरवाणी आणि संतापजनक घटना वसईतील ऐका कंपनीत घडली आहे. येथे कार्यरत महिलांच्या बादलीत कोणी लघवी करून ते पाणी महिलांना पाजण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कंपनीत काम करणाऱ्या तीन मुलींना मालकाकडे तक्रार केली. मात्र त्याने उलट मुलींवरच संशय घेतल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठून रितसर तक्रार नोंदवली. मुलींनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस चौकशी करत आहेत.
कंपनीत रात्री झोपायला येणाऱ्या कामगारानीच हे किळसवाणं कृत्य केल्याचा आरोप मुलींनी आपल्या तक्रारीत केला आहे. ही घटना वसई पूर्वेच्या विशाल ११० या कंपनीत घडली. येथे इंमिटेशन ज्वेलरी बनवल्या जातात. या कंपनीत तीनच मुली काम करतात. या कंपनीच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या कंपनीतील कामगार येथे रात्री झोपण्यासाठी येतात. त्यांनीच हे कृत्य केल्याचा संशय आहे.
शुक्रवारी सकाळी या मुली कंपनीत आल्यावर त्यातील एका मुलीने पिण्याच्या बाटलीतील पाणी प्यायले. मात्र पाण्याचा उग्र वास व चव कशीतरीच लागल्याने तिने उलटी केली. बाटलीतील पाणी नीट पाहिले असता त्यात कोणीतरी लघवी करून ठेवल्याचे लक्षात आले. अन्य पाण्याच्या बाटल्यातही युरिन ठेवण्यात आल्याचा आरोप मुलींनी केला आहे.
या प्रकाराने हादरलेल्या मुलींनी याची माहिती मालकाला दिली व हा किळसवाना प्रकार रात्री झोपायला आलेल्या कामगारांनीच केल्याचा आरोप केला. मात्र मालकाने यावर काहीच कारवाई न करता उलट मुलींवरच संशय घेतला. यानंतर संतापलेल्या मुलींनी थेट वसईचं माणिकपूर पोलीस गाठून आरोपींसह कंपनीच्या मालकावरही कारवाई करण्याची लेखी तक्रार दिली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.