क्राइम

वाईट हेतुने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून फ्लॅटमध्ये डांबले

Spread the love
विविध कलमा अंतर्गत तिघांवर गुन्हा दाखल
अमरावती / प्रतिनिधी 
             वाईट हेतूने एका 13 वर्षीय मुलीचे अपहरण तिला फ्लॅट मध्ये डांबून ठेवल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात आले आहे.यामुळे शहरात खळबळ माजली आहे. शेजारी राहणाऱ्या मुलाने आपल्या मित्राच्या साह्याने हे गैरकृत्य केले आहे. मुलगा त्याचा मित्र आणि मावशीच्या विरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२६ एप्रिल रोजी पहाटे १.३६ च्या सुमारास गाडगेनगर पोलिसांनी त्या गुन्ह्याची नोंद घेतली.
तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलगा व पीडित मुलगी हे एकमेकांचे शेजारी आहेत. त्यांचे एकमेकांशी बोलणेदेखील सुरू असायचे. २४ एप्रिल रोजी दुपारी २.३० च्या सुमारास त्या ओळखीतील अल्पवयीन मुलाने त्याच्या एका मित्राच्या मदतीने तिचे अपहरण केले. ते तिला दुचाकीवर बसवून त्यांच्या मावशीच्या फ्लॅटवर घेऊन गेले. तेथे त्या अल्पवयीन मुलाने तिच्यावर लैैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करीत तिच्याशी गैरकृत्य केले. तिचा विनयभंग केला.
ती रात्रभर करत राहिली विनवणी –
अकस्मात झालेले अपहरण व त्यानंतर फ्लॅटमधील गैरकृत्याच्या प्रयत्नामुळे ती १३ वर्षीय मुलगी नखशिखांत हादरली. तिने रडून अख्खा फ्लॅट डोक्यावर घेतला. मात्र, २४ ची संपूर्ण रात्र तिला त्याच फ्लॅटमध्ये डांबून ठेवण्यात आले. वारंवार घरी सोडून देण्याची तिची विनंती धुडकावून लावण्यात आली, तर २५ ची सकाळ उजाडताच तिला ऑटोरिक्षासाठी पैसे देऊन तिची सुटका करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध  विनयभंग, अपहरण, गुन्ह्यासाठी प्रेरित करणे व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे दाखल केल्याची माहिती गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी दिली.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close