क्राइम
मध्यरात्री घरात घुसुन बायको आणि मुलीं समोर इसमाचा खून
पुणे / प्रतिनिधी
पुण्यात कर्वेनगरमध्ये ४२ वर्षीय व्यक्तीचा त्याच्या घरात घुसून मध्यरात्री खून करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पत्नी आणि मुलींच्या समोरच तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. राहुल पंढरीनाथ निवगुणे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. कर्वेनगरमधील उच्चभ्रू अशा श्रीमान सोसायटीत ते राहत होते. शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1
1