खते, बियाणांवर कुषी विभागाची करडी नजर- आर्वी तालुक्यात भरारी पथके तैनात
शेतकरी बांधवांनी सजग राहावे* प्रत्येक कृषी केंद्रावर कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षकांची केली नियुक्ती.
आर्वी :-प्रतिनिधी
देशाचा तारणहर्ता शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला असुन आर्वी तालुक्यात मोठ्या संख्येत कुषीसेवा केन्द्र, असुन, आर्विच्या ग्रामीण भागात सुध्दा ही अस्तित्वात दिसून येत आहे.
वस्तुतः खरीप हंगामात लागवड करण्यासाठी बियाणे व रासायनिक खते शेतकऱ्यांना योजना व माफक दरात, तसेच गुणवत्तापूर्ण मिळावे, यासाठी आर्विच्या कुषी विभागाची दुकानावर करडी नजर राहणार आहेत.
बियाणांचा काळाबाजार व नफाखोरी होवू नयेत, निकुष्ठ दर्जाचे बियाणे, खते शेतकऱ्यांच्या माथी मारले जावू नयेत, यासाठी आवश्यक तेथे भरारी पथके तैनात करण्यात येणार आहेत??
किमतीपेक्षा जादा दराने शेतकऱ्यांना खते व बि-बियाणे विक्री केल्यास संबंधित दुकानदारावर कठोर कारवाई केली जाणार आहेत. आर्वी व सभोवतालच्या ग्रामीण परिसरात 85 या सारख्या मोठ्या संख्येत कुषीसेवा केन्द्रे कार्यरत आहेत. तसेच ग्रामीण भागात असणाऱ्या केन्द्रामधून जादा दराने रासायनिक खते व बियाणांची विक्री केली जाते, अशा सतत तक्रारी ग्रामीण भागातून कुषीविभाकडे सातत्याने येत असतात. त्यामुळे शासनाने निर्धारित करून दिलेल्या किमतीत व उत्कृष्ट रासायनिक खते व बियाणे कुषीसेवा केन्द्रचालकांनी शेतकऱ्यांना विक्री करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहेत. मात्र निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यास अशा कुषीसेवा केन्द्रावर कुषी विभागाकडून सक्त कारवाई केली जाणार आहे.
दिनांक 16 मे पासून प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर एक कृषी सहाय्यक व एक कृषी पर्यवेक्षक काची नियुक्ती तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून करण्यात आली आहे सदर नियुक्ती ही उच्च प्रतीच्या खत व बियाणे मध्ये कोणत्याही प्रकारचे निकृष्ट दर्जा चे शेतकऱ्यांना ऋषिकेश सेवा केंद्राच्या संचालकाकडून देण्यात येणार नाही तसेच जे शासकीय भाव आहे त्याच भावात विकल्या जाईल याची शासनाकडून पूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे कोणत्याही मालाचा कृत्रिम तुटवडा कृषी सेवा केंद्राकडून निर्माण न करता शेतकऱ्यांना ज्यावेळेस खत व बियाणे लागेल त्यावेळेस त्यांना ते उपलब्ध करून द्यावे लागेल अशीही सक्त ताकीद कृषी अधिकारी यांच्याकडून कृषी सेवा केंद्राच्या संचालकांना देण्यात आलेली आहे असे असताना अगर कोणत्याही कृषी सेवा केंद्र संचालकाने संबंधित शेतकऱ्याला खत व विविध प्रकारचे पाहिजे असलेले बियाणे उपलब्ध करून न दिल्यास कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करेल व पुढील कारवाई कृषी सेवा केंद्र संचालक हा जबाबदार राहील.
शेतकरी बांधवांना न्याय मिळावा म्हणून यासाठी आम्ही कुषी विभागाच्या माध्यमातून भरारी पथके तैनात करणार, असुन ,खते व बियाणे हे वाजवी दराने संबंधित दुकानदाराने विक्री करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित दुकानदाराने शेतकऱ्यांना जास्त दराने बियाणे विक्री केल्यास योग्य ती दंडात्मक कारवाई केल्या जाईल.
कुमारी सुप्रिया वायवड
*तालुका कुषी अधिकारी*
आर्वी जिल्हा. वर्धाशेतकरी बांधव अस्मानी व सुलतानी संकटामुळे त्रस्त आहेत, त्यालाही काही दुकानदार बि बियाणांची विक्री जास्त भावाने करतात, अशी शेतकरी बांधवाचे म्हणणे आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी खते व बियाणे घेतांना त्याच्यावरची किमंत पाहून खरेदी करावी, एक्सपायरी डेट संपलेले खते व बियाणे अजिबात घेवू नयेत. काळाबाजार करणाऱ्या कुषीसेवा केन्द्रावर शेतकरी बांधवांनी करडी नजर ठेवावी.
*जीवन आसोले*
शेतकरी आर्वी.
………………..