सामाजिक

खासदार औद्योग‍िक महोत्‍सव – अॅडव्‍हांटेज विदर्भ’चा आज समारोप

Spread the love

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
– कॉफी टेबल बुकचे होणार प्रकाशन

नागपूर, / प्रतिनिधी

असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंट (एड) च्‍यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून आयोजित करण्‍यात आलेल्‍या तीन दिवसीय खासदार औद्यो‍गिक महोत्‍सव – अॅडव्‍हांटेज विदर्भ या विदर्भातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रियल एक्स्पो, बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचा आज सोमवार, 29 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता समारोप होत आहे.
राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्‍या प्रशासकीय इमारतीच्‍या भव्‍य परिसरात सुरू असलेल्‍या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी व राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्‍थ‍िती राहणार आहे. यावेळी देशाच्‍या आर्थिक विकासात भरीव योगदान देणा-या विदर्भातील उद्योजकांच्‍या यशोगाथांचे कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्‍यात येईल.
या कार्यक्रमाला उपस्‍थ‍ित राहावे, असे आवाहन असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे; उपाध्यक्ष प्रणव शर्मा आणि गिरधारी मंत्री; सचिव डॉ.विजय शर्मा; कोषाध्यक्ष राजेश बागडी व सदस्य राजेश रोकडे, निखिल गडकरी, डॉ.महेंद्र क्षीरसागर, प्रदीप माहेश्वरी, प्रशांत उगेमुगे, रवींद्र बोरटकर यांनी केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close