क्राइम

खामगावात रिव्हेंज पॉर्न व्हायरल ; सायबर सेल कडून तपास सुरू 

Spread the love

खामगाव / नवप्रहार मीडिया 

                       सध्या ज्यांना प्रेमाचा नीट अर्थ कळत  नाही असे टिन येजर्स देखील प्रेमात पडतात. इंटरनेट वर सहज उपलब्ध होणाऱ्या अश्लील साहित्यामुळे मुले वेळेपूर्वीच वयात येत आहेत. तर काही अल्पवयीन मुलांचे मुख्यतः मुलींचे लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडीओ बनवले जातात. आणि तेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सतत त्यांचे लैंगिक शोषण केले जाते. अनेक वेळा प्रेमात असलेले तरुण तरुणी एकमेकांना आपले न्यूड फोटो किंवा व्हिडीओ पाठवतात. आणि त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले की बदला घेण्याच्या उद्देशाने ते व्हायरल करण्यात येतात. खामगाव शहरात बदला घेण्याच्या उद्देशाने असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात मुलीची बदनामी होत आहे. या प्रकरणात तक्रार झाकि असून सायबर सेल आरोपीचा शोध घेत आहे.

खामगावात काय घडतं आहे?

खामगावात सध्या रिव्हेंज पॉर्नचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध पोलीस प्रशासन, सायबर विभागाच्या वतीने घेत आहे. प्रेमभंग झाल्याने पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचे फोटो, व्हिडीओ व्हायरल करणे, नकार देणाऱ्या जोडीदाराला अद्दल घडवण्यासाठी, सूड उगवण्यासाठी रिव्हेंज पॉर्नचा वापर होतो आहे. ज्यावर सायबर विभागाची करडी नजर आहे.

प्रेमात असताना भावनेच्या आहारी जाऊन रेकॉर्ड केलेली प्रणयदृष्यं, एकमेकांना पाठवलेले नग्न, अर्धनग्न फोटो, व्हिडिओ बदनामी करण्याच्या उद्देशाने पॉर्न साईटवर टाकण्यात येतात किंवा सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. एकमेकांना बदनाम करण्यासाठी मार्गाचा अवलंब करणं याला सायबरक्राईमच्या भाषेत म्हणतात ‘रिव्हेंज पॉर्न’. रिव्हेंज पॉर्नच्या गुन्ह्यांनी सध्या खामगावात प्रचंड धुमाकूळ घातलाय.

बुलढाणा जिल्ह्यातील पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे अशा तक्रारी प्राप्त झाल्यापासून खामगाव पोलीस अशाचा शोध घेत आहेत. दरम्यान, कुणाचे प्रायव्हेट तथा पॉर्न व्हिडिओ बाळगणे व्हायरल करणे कायद्याने गुन्हा असून, खामगावात अशा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या संदर्भात तक्रार प्राप्त झाली असून, त्या तक्रारीच्या अनुषंगाने सायबर विभागाची मदत घेतल्या जात आहे. लवकरच असे व्हिडिओ व्हायरल करणारे जेरबंद केले जातील असा इशारा खामगाव चे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close