स्पर्धात्मक काळात खामगाव बँकेने केलेली प्रगती उल्लेखनीय- प्रकाश बुद्धदेव
मोर्शी। / ओंकार काळे
बँकिंग क्षेत्रात सध्या अनेक आव्हाने आणि स्पर्धा वाढत असताना खामगाव अर्बन बँकेने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. भविष्यात बँकिंग क्षेत्रात टिकून राहायचे असेल तर प्रगतीचे एक पाऊल नेहमीच पुढे हवे, असे मत प्रकाश बुद्धदेव यांनी ग्राहक मेळाव्या प्रसंगी विचार व्यक्त केला
दि. खामगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने सहकार सप्ताहाच्या निमित्याने बँकेच्या सभागृहात ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजंता जनरल स्टोअर चे संचालक प्रकाश बुद्धदेव,
व खामगाव बँकेचे संचालक प्रशांत देशपांडे,दि खामगाव अर्बन बँकेची विभागीय व्यवस्थापक निशिकांत अग्निहोत्री, शाखा संचालक संजय पेठे, अंकुश ठाकरे, दिलीप अग्रवाल प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून लक्ष्मीच्या फोटोची पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती.यावेळी अग्निहोत्री यांनी आपल्या भाषणात बोलताना व्यक्त केले संगणकीय युगात बँकेने उत्तम प्रगती केली आहे. त्याचप्रमाणे बँकेचा एनपीए सुद्धा कमी झाला आहे. बँकेच्या ग्राहकासाठी अनेक कर्जाच्या योजने माहिती उपस्थित ग्राहकांना देण्यात आल