क्राइम

खून करून एक तास मोबाईल पाहत राहिला आणि मृतदेहा शेजारीच झोपला

Spread the love

नागपूर / नवप्रहार मीडिया  नेटवर्क

               उपराजधानी नागपूर येथून एक संतापजनक आणि क्लेशदायक प्रकार समोर आला आहे. येथे एका नवऱ्याने शुल्लक कारणावरून आपल्या बायकोचा खून केला आहे. फक्त खुनच केला नाही तर त्यानंतर तो एक तास मोबाईल पाहत बसला.आणि त्यानंतर मृतदेहा शेजारीच झोपला. घटना शहरातील हुडकेश्वर भागात घडली आहे.

ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास हुडकेश्वरमध्ये उघडकीस आली. नायरा शफी खान (वय ३५, टेक ऑफ गार्डन सीटी, हुडकेश्वर) असे मृत महिलेचे तर समीर मोहम्मद हनीफ अन्सारी (वय ४८) असे आरोपी पतीचे नाव आहे.

समीर अन्सारी याचा फेब्रिकेशनचा व्यवसाय आहे. त्याचा ७ वर्षांपूर्वी नायरा खान हिच्याशी विवाह झाला. नायरा यांना शारीरिक समस्यांमुळे मुलबाळ नव्हते. गेल्या दोन वर्षांपूर्वी समीर आणि नायराने टेक ऑफ सीटी अपार्टमेंटमध्ये सदनिका घेतली होती. दोघांत नेहमी वाद होत होते. रविवारी रात्री समीर झोपेतून उठला आणि मोबाईल बघत बसला. काही वेळात त्याने पत्नीला झोपेतून उठवले.

मात्र, तिने झोपेतून उठण्यास नकार दिला. त्यामुळे समीरचा राग अनावर झाला. त्याने स्वयंपाक घरातील सिलिडर आणले आणि झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात घातले. त्यानंतर त्याने पुन्हा तासभर मोबाईल बघितला आणि पत्नीच्या मृतदेहाशेजारीच झोपला. सकाळी हे हत्याकांड उघडकीस आले. हुडकेश्वर पोलिसांनी नायरा यांचा मृतदेह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. आरोपी पती समीरला अटक केली. पुढील तपास सुरु आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close