केंद्रीय विद्यालयात संविधानावर व्याख्यानमालेचे आयोजन
मुदखेड नांदेड (प्रतिनिधी )
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्ताने “संविधान वर्ष” आयोजनार्थ दरमहा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय विद्यालय, केंद्रिय राखीव पोलीस बल ट्रेनिंग कॉलेजमुदखेड परिसर येथे भारतीय संविधानावर आधारित एका प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदरील कार्यक्रमात प्रसिद्ध वकील माधव हटकर यांनी भारतीय संविधान निर्मितीचे पार्श्वभूमी, विविध आव्हाने आणि संविधानाचे महत्त्व यावर विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच संविधानाबद्दलची जिज्ञासा वाढवून संविधान वाचनासाठी प्रेरित केले.
विद्यालयाचे प्राचार्य अजय चौकीकर यांची विशेष उपस्थिती होती तर सर्वशिक्षक यात सहभागी झाले. सूत्रसंचालन लिंकेश मस्के यांनी केले तर मान्यवरांचे आभार खुर्शिदपाशाशेख यांनी मानले.