ती त्यांना घरी बोलवायची आणि त्यांच्या सोबत अश्लील चाळे करून बनवायची व्हिडीओ

मुंबईत / नवप्रहार मीडिया नेटवर्क
ती त्यांना घरी बोलवायची त्यांच्या सोबत शरीरसंबंध बनवायची.दरम्यान त्याचा व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करायची. पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून तिला अटक करण्यात आली आहे. तिने या माध्यमातून सुमारे 35 लाख रुपये गोळा केल्याचे सांगण्यात येत आहे. या देहविक्री टोळीचा नुकताच कर्नाटक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
दरम्यान, पीडित व्यक्तीने पोलिसांत तक्रार केल्यावर ही बाब निदर्शनास आली. तक्रार करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, नेहा उर्फ मेहर असे महिलेचे नाव आहे. मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर पीडित व्यक्तीची मेहरशी ओळख झाली. यानंतर दोघेही व्हॉट्सअॅपवर बोलू लागले. दरम्यान, नेहाने सांगितले की, तिचा नवरा दुबईत काम करतो. याचदरम्यान नेहाने पीडित व्यक्तीबरोबर सेक्स करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महिलेने तिचा फोटो आणि पत्ताही त्याच्यासोबत शेअर केला होता.
3 मार्चचे प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, 3 मार्च रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास तो मेहेरच्या घरी पोहोचला. त्याने आरोप केला आहे की, जेव्हा तो महिलेसोबत बेडरुममध्ये होता तेव्हा तीन पुरुष आतमध्ये आले. त्यांनी त्याला विचारले की, तो इथे का आला आहे? यानंतर या सर्वांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण केल्यानंतर या लोकांनी त्याच्याकडे 3 लाख रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच पैसे न दिल्यास विवस्त्र करुन भर रस्त्यात धिंड काढली जाईल, अशी धमकी दिली. त्यानंतर तुला आम्ही मशिदीत नेऊ आणि सुंता करुन मेहरसोबत लग्न लावू. यानंतर त्याने मोबाईल क्रमांकावरुन 21,500 रुपये ट्रान्सफर केल्याचे पीडित व्यक्तीने सांगितले.
ओलीस ठेवले होते
त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत गॅंगने त्याला ओलीस ठेवले, असे पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितले. यानंतर त्याला क्रेडिट कार्डवरुन अडीच लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले. त्यावर त्याने माझे क्रेडिट कार्ड घरी असल्याचे सांगितले. त्याने आरोपीला माझ्यासोबत घरी चला, तिथे मी पैसे देतो, असे सांगितले. परंतु घरी जाताना तो या गॅंगला चकवा देत तावडीतून निसटला. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरु केला. यादरम्यान, सेक्सटोर्शन रॅकेटने 50 लोकांना आपल्या जाळ्यात अडकवल्याची माहिती मिळाली. यानंतर ब्लॅकमेल करुन 35 लाखांहून अधिक रक्कम वसूल केली. सध्या या गॅंगमधील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर मेहेरचे लोकेशन मुंबईत सापडले आहे.