क्राइम

केळीच्या पाना वरून वाद ; कात्रीने वार करून एकाला केले जीवनातून बाद

Spread the love

पित्याचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी, आई किरकोळ जखमी 

कल्याण / विशेष प्रतिनिधी 

केळीच्या पानाची अदलाबदल झाल्याने  दोघात वाद झाला. सुरवातीला किरकोळ वाटणारा हा वाद एवढा विकोपाला गेला की 20 वर्षीय तरुणाने पती – पत्नी आणि मुलावर कात्रीने वार केले. यात पित्याचा मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी आहे.त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतकाची पत्नी किरकोळ जखमी आहे. या घटनेने बाजार समितीत खळबळ माजली आहे.

चमनलाल कारला असे मृत व्यक्तीचे नाव असून मुलगा कार्तिक गंभीर जखमी आहे. त्याच्यावर कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कल्याण APMC मार्केटमध्ये आज मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर बाजारपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

नक्की घडले काय?

चमनलाल कारला आणि चिराग सोनी हे दोघेही एपीएमसी मार्केटमध्ये केळीची पाने विक्री करतात. आज सकाळी विक्रीसाठी आणलेल्या केळीच्या पानांच्या बंडलमध्ये अदलाबदल झाली. अदलाबदली झाल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. चिरागने रागाच्या भरात कात्रीने चमनलाल, त्यांच्या पत्नीवर आणि मुलावर हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चमनलाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कार्तिक कारला गंभीर जखमी असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पत्नीला किरकोळ जखम झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी चिराग सोनीला अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. बाजारात भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये शनिवारी भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने बाजारपेठेत गोंधळाचे वातावरण होते. एका किरकोळ वादातून 20 वर्षीय तरुणाने पती-पत्नी आणि त्यांच्या मुलावर कात्रीने हल्ला केला. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला आहे. पत्नीला किरकोळ दुखापत झाली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close