Uncategorized

अंजनगावात निघाली शिवभक्तांच्या उपस्थितीत कावड यात्रा

Spread the love

 


अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अधिक मास व श्रावण महिन्याच्या पर्वावर अंजनगाव सुर्जी येथे निळकंठ कावड यात्रा व बजरंग दल , विश्व हिंदू परिषद बालवीर व्यायाम शाळा, सूर्यवंशी व्यायाम शाळा , युवा वर्ग यांचे संयुक्त विद्यमाने अंजनगाव शहराच्या मुख्य मार्गाने भव्य दिव्य अशी कावड यात्रा काढण्यात आली यामध्ये भगवान भोले शंकरांच्या चित्र रथाचे प्रमुख आकर्षण होते, यावर्षीला निळकंठ कावड यात्रा ही शहरातील विठ्ठल मंदिर संस्थान येथून निघाली असून दुसरी कावड यात्रा ही दर्यापूर रोडवरून सराफा लाईन ते शनिवार पेठ पान अटाई गुलजारपुरा मार्गे पाचपावली या ठिकाणावर समारोप करण्यात आला तर दुसरी कावड यात्रा ही विठ्ठल मंदिर संस्थान ते माता माय मार्गे शहरातील मुख्य डीपी रोड ते आयडिया टावर रोड ते संगत संस्थान ते सराफा लाईन शनिवार पेठ चौक , गुलजारपुरा मार्गे कावळयात्रेचा समारोप शहानूर नदी काठावरील भोले शंकरांच्या मंदिरात कावळी सोबत आणलेल्या जलाच्या पाण्याने भगवान शंकरांचा जलाभिषेक करून व महाआरती करून समारोप करण्यात आला , कावळ यात्रेच्या मार्गावर भक्तांनी रांगोळ्या काढून पाणी, शरबत, चहा ची व्यवस्था करण्यात आली होती, यात्रेमध्ये शहरातील सर्व भाविक भक्त व भजनी मंडळ वारकरी भजन मंडळ यांची प्रमुख उपस्थिती होती

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close