करवा चौथ उद्यापन 20 तारखेला
बाळासाहेब नेरकर कडुन
अकोला-: चित्रा चौक येथील श्री बालाजी मंदिर येथे अकोला पुरोहित संघांची सभा रविवार 20 ऑक्टोबर रोजी येणारी करक चतुर्थी करवा चौथ उद्यापन होणार की नाही? या विषयाला घेऊन संपन्न झाली, करवा चौथ या संबंधित भ्रामक विचार प्रसारित झाले होते की क्षय तिथि असल्याने उद्यापन होणार नाही निर्णय सिंधू धर्म सिंधू अशा महत्वपूर्ण ग्रंथांमध्ये असे काहीही वर्णण नाही, महाराष्ट्रीयन पंचांग मध्ये चतुर्थी तिथि क्षय नाही, करवा चौथ या तिथीला भारतीय स्त्रियांमध्ये खूप महत्त्व आहे महिलावर्ग या तिथीवर करवा चौथ चे उद्यापन करतात यावर्षी सुद्धा आपण करवा चौथ से उद्यापन करू शकतात चांदनी बुडी इत्यादी कालामध्ये हे उद्यापन होऊ शकत नाही परंतु अशी काही अडचण या करवा चौथले नाही तर आपण करवा चौथले उद्यापण करू शकतात गणरायाचे अभिषेक पूजा पाठ यथाविधी करू शकतात असे स्पष्टीकरण अकोला पुरोहित संघ च्या वतीने सांगण्यात आला, या सभेमध्ये शिवकुमार इंदोरिया, कमल शर्मा, चंद्रकांत शर्मा, हितेश मेहता, रतन तिवारी, नरेंद्र पंचारिया ,सचिन भाई राजगुरू ,श्याम अवस्थी ,जनक घनश्याम जोशी, बाबूलाल तिवारी , दीपक तिवारी, दीपक शर्मा ,धीरज तिवारी, सचिन शर्मा ,आलोक शर्मा, प्रमोद तिवारी, लाला तिवारी ,हरीश उपाध्याय ,शिव शर्मा, हेमंत शर्मा, राजेश शर्मा, भैरू शर्मा ,देवेंद्र शर्मा ,रमेश आडीचवाल एवं पंडित रवी कुमार शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.