श्रीराम प्रतिष्ठापना दिनानिमित्त ़कारसेवकांचा सन्मान सोहळा
डॉ. योगेश साहू व अतुलजी कोंडोलीकर यांचा पुढाकार
अकोला. – अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर निर्माण होऊन त्यामध्ये रामलल्ला विराजमान झाल्याचा आनंद सर्वानाच झाला. पण तत्पूर्वी याकरिता आपला सिंहाचा वाटा रामाच्या चरणी समर्पित करणारे जवळपास १७५ कारसेवकांचा अयोध्या योद्धा म्हणून महसूल कॉलनीतील मिलन सभागृहात डॉ. योगेश साहू व अतुलजी यांच्या पुढाकाराने हा सोहळा अत्यंत आनंदात पार पडला. मंचावर महानगर संघचालक गोपालजी खंडेलवाल, श्री रविजी भुसारी, महात्मा तुरियानंदजी मंगलजी पांडेसह मान्यवर होते.
नुकत्याच पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उघाटक म्हणून महानगर संघचालक गोपालजी खंडेलवाल होते तर प्रमुख वक्ते म्हणून श्री रविजी भुसारी लाभले होते. प्रमुख उपस्थितीत महात्मा तुरियानंदजी व ज्येष्ठ कारसेवक ंम्हणून मंगल पांडे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी लाभली होती. या कारसेवकांच्या सन्मान सोहळ्यात १७५ कारसेवकांना निमंत्रण पत्रिकेद्वारे सन्मानान बोलाविण्यात आले होते. यावेळी महेश मुरकट, अडगाव, सौ अंजली ताई देशमुख, प्रतिभा ताई गावपांडे, संदेशजी खंडेलवाल
श्रीकांतजी कोंडोलीकर यांनी आपल्या अनुभव कथन केले.
आदरयुक्त कारसेवकांना अत्यंत सन्मानाने व त्यांनी प्रभू श्रीरामाप्रती कारसेवेच्या माध्यमातून सेवा करण्याचे अहोभाग्य मिळाले म्हणून त्यांचा सन्मान हा व्हायलाच हवा या उदात्त हेतूने लोकसेवा संघाचे अध्यक्ष व क्रीडा भारती अकोलाचे उपाध्यक्ष प्रसिद्ध दंतरोगतज्ज्ञ डॉ. योगेश साहू व क्रीडा भारती अकोला विभागाचे संयोजक अतुल कोंडोलीकर यांनी हा दुग्ध-शर्करा योग जुळवून आणल्याच्या प्रतिक्रीया शहरात उमटत आहेत. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार डॉ. योगेश साहू यांनी तर संचालन रूपेश शहा यांनी केले.