कर्मयोगी फाउंडेशन तर्फे गरजवंतांना काठी कुबडी वाटप ; पत्रकार बांधवाचा सत्कार
धामणगाव रेल्वे / हितेश गोरिया
आसेगाव येथील कर्मयोगी फाउंडेशन च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
गरजवंतांना एक मदतीचा हात म्हणून कर्मयोगी फाउंडेशन नेहमी अग्रेसर असतात. आतापर्यंत १३६ गावामध्ये अत्यंत गरजू लोकांना कुबडी, शिलाई मशीन तसेच विध्यार्थ्यांना सायकल वाटपाच्या स्वरूपात एक मदतीचा हात म्हणून काम करीत आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज २३ ऑगस्ट रोजी आसेगाव येथे वृद्धांना काठी कुबडी वाटपासह लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकार बंधूंचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सर्वप्रथम राष्टसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, मार्गदर्शन यांचे स्वागत करण्यात आले असून त्यानंतर उपस्थित गरजूवंत नागरिकांना पत्रकार बांधवाच्या हस्तेच काठी कुबडीचा वाटप करण्यात आला. तसेच कर्मयोगी फाउंडेशन च्या वतीने कार्यक्रमाला उपस्थित पत्रकार सुरज वानखडे, संतोष वाघमारे, सचिन मुन, हितेश गोरिया, गजानन फिरके, देवेंद्र भोंडे, प्रज्योत पहाडे, शशांक चौधरी महेंद्र काळे, अक्षय पुंडकार यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आसेगाव चे सरपंच अविनाश मांडवगणे, प्रमुख पाहुणे पंकज गायकवाड, विजेंद्र दरवडकर ( सरपंच सावळा ) कर्मयोगी फाउंडेशन चे तालुका अध्यक्ष विनोद तितरे, उपाध्यक्ष विशाल ठाकरे, सचिव राजू निस्ताने आणि मार्गदर्शक विजय पाटिल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल ठाकरे यांनी केले असून आभार प्रदर्शन राजू निस्ताने यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कर्मयोगी फाउंडेशन आसेगाव च्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी अतिशय मेहनत घेतली…
🔥 बोलते न्वहे तर करते व्हा🔥