क्राइम

महिलेचे विवस्त्र अवस्थेतील चित्रीकरण करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल 

Spread the love

पनवेल / प्रतिनिधी

                     स्मार्ट मोबाईल आल्या पासून सायबर क्राईम क्या गुन्ह्यात कमालीची वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.  महिलांच्या बाथरूम मध्ये किंवा चेंजिंग रूममध्ये कॅमेरा लावून चित्रीकरण करणे आणि  ते सबंधित महिलेला दाखवून तिला शरीर सुखाची मागणी करणे . तसेच ब्लॅकमेलिंग करणे असले प्रकार घडत आहेत. काही महिला लाजेखातर तक्रार द्यायला लाजत असल्याने अश्या विकृत मानसिकतेच्या लोकांची हिम्मत वाढत आहे. असाच प्रकार उघड झाला आहे.

बाथरुममध्ये आंघोळ करीत असणार्‍या एका महिलेचे चित्रण करणाऱ्या तरुणाविरोधात पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिल्डींगच्या डकच्या पॅसेजमधून वर चढून बाथरुमच्या खिडकीमधून स्वतःच्या मोबाईलमधून सदर तरुणाने महिलेच्या नकळत तिचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ चित्रीत केला.

तालुक्यातील कोंडले गाव येथील एकदंत संकुल को.ऑपरेटीव्ह सोसायटीमध्ये ही खळबळजनक घटना घडली. एका 20 वर्षीय तरुणाने त्या सोसायटीमध्ये राहणार्‍या एका महिलेचा बाथरुममध्ये आंघोळ करीत असतानाच व्हिडीओ चित्रीत केला. याबाबत महिलेने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात सदर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close