कारंजा लोकेशन 175समृद्धी महामार्ग वर अपघात दोन जखमी. ट्रक जळून खाक*
कारंजा / प्रतिनिधी
दि 11/2/24 सकाळी 5:30 सुमारस दि सविस्तर वृत्त असे की ट्रक क्रमांक PB46W1738 हा नागपूरकडे जात असताना समृद्धी महामार्ग लोकेशन 175 साईडला उभा असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला सदर ट्रक मध्ये हायड्रोजन मनाॉक्साईड केमिकल होते. ट्रकची जबरदस्त धडक झाल्याने स्पार्क होऊन ट्रकला आग लागली. यामध्ये अंदाजे 20 लाखाचे नुकसान झाले व या आगी मध्ये ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी लोकेशन 108 पायलट आतीश चव्हाण व डॉक्टर भास्कर राठोड व फायर टीम तसेच एम एस पी टीम व हायवे पोलीस हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग जबरदस्त असल्याने तेथील फायरमॅन विलास खानंदे यांनी तात्काळ नगरपरिषद अग्निशामक दल कारंजा अधिकारी बाथम साहेब यांना घटनेची माहिती दिली. तात्काळ अग्निशामक दल कारंजा घटनास्थळी दाखल झाले. व आगर नियंत्रण मिळविले.चालक बाळू काठोळे फायरमॅन नरेंद्र भोयर राहुल गुल्हाने यांनी अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. समृद्धी महामार्गावरील हायवे पोलीस सुरक्षारक्षक महाराष्ट्र व अग्निशामक दल समृद्धी महामार्ग यांनी ट्रकचालकाला व क्लीनरला बाहेर काढले. हे दोघेही अपघातामध्ये जखमी झाले. जखमीचे नाव चालक बकशिर सिंग वय 35 सरंजीत बसीर वय रा पंजाब 25 यांच्या पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे त्यांना दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर केले.