कापूस वेचून परतणाऱ्या टाटा एस गाडीचा तळणी फाट्याजवळ अपघात
मोर्शी(तालुका प्रतिनिधी)दि.३०/१०
अपघातात ११ मजूर जखमी, ३मजूर महिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.टाटा एस गाडीत होते १९ मजूर
शेतातून काम आटोपून येणाऱ्या मजुरांचा टाटा एस पलटी होऊन झालेल्या अपघातात 19 महिला शेतमजूर जखमी झाल्या असून त्यांना उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे भरती करण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य पाहून तीन महिला शेतमजुरांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.सदर घटना सोमवार दि.30 ऑक्टोबर रोजी एक वाजताचे सुमारास तळणी येथे घडली.
प्राप्त माहितीनुसार मनीषा झींगडे ,साधना गोडसे, लता ढोले, सविता जुवारे ,संगीता वाघ ,आशा कुऱ्हाडे, इंद्रकला गोंडसे ललिता शिरभाते, शांताबाई बोकड, गीता नरवरे, संगीता धोटे मीनाभरनपुरे रेखा वानखडे, मंगला खवले, कमला युवनाते, संगीता धोटे ,लता ढोले, वर्षा कुऱ्हाडे ,शालिनी मेंढे ,वर्षा शिरभाते या 30 ते 60 वर्ष वयोगटातील महिला शेतमजूर पिंपळखुटा लहान येथील ईश्वर टिपरे यांच्या शेतात कापूस वेचण्यासाठी सकाळी श्याम अशोकराव दळवी यांच्या टाटा एस क्र.एम एच 27 ई एफ 3419 मध्ये गेल्या होत्या.शेतातील कापूस वेचून झाल्यावर पिंपळखुटा लहान हुन तळणी मार्गाने मोर्शी येण्यासाठी निघाल्या असता तळणी येथे वळण रस्त्यावर सदर टाटा एस पलटी झाल्यामुळे टाटा एस मध्ये बसून असलेल्या 19 शेतमजूर महिला जखमी झाल्या.त्यांना लोकांच्या मदतीने तात्काळ उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे भरती करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार केल्यानंतर रेखा वानखडे,मंगला
युवनाते,मनीषा झिंगडे या तीन महिलांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले.उर्वरित शेतमजूर महिलांचा इलाज उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहे. घटनेची फिर्याद मोर्शी पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहे.मध्यप्रदेश व मोर्शी शहरातून मजुरांना घेऊन टाटा एस ,पीकअप सारख्या वाहनामध्ये बसून महिलांना शेतमजुरीसाठी गावागावात नेण्याचा प्रकार सर्रास सुरू असून यापुढे मोठी दुर्घटना घडू शकते.त्यामुळे अशा वाहनांना बंदी घालण्यात यावी.अशी मागणी नागरिकांकडून केल्या जात आहे.