क्राइम
कलियुग.. ! घोर कलियुग….!! नऊ वर्षाच्या मुलाला तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक

पुणे / विशेष प्रतिनिधी
सध्या कलियुग सुरू असून यात काहीही होऊ शकते किंवा काहीच अशक्य नाही असे मिश्कीलपणे म्हटल्या जाते. पण गमतीत म्हटलेली ही गोष्ट काही प्रमाणात खरी होतांना दिसत आहे. पुण्यात असाच प्रकार घडला आहे. येथे इयत्ता 3 रीत शिक्षण घेणाऱ्या एका नऊ वर्षाच्या मुलाला 3 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले.
अवघ्या तिसरीतील मुलगा असं कृत्य कसा करू शकतो, असा सवाल ही उपस्थित केला जात आहे. मात्र सोशल मीडियाच्या प्रभावाखाली मुलाने अशा प्रकारचं कृत्य केल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून कोंढवा पोलिसांनी काल 17 डिसेंबरला एका नऊ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतलं. पोलिसांनी मुलाला ज्युवेनाईल जस्टिस बोर्डासमोर (जेजेबी) हजर केलं आहे. त्याचा जामीन मंजूर केला आणि त्याचा ताबा पालकांच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले आहेत. मुलगी प्री-स्कूलची विद्यार्थिनी आहे. तर मुलगा स्थानिक शाळेत इयत्ता तिसरीचा विद्यार्थी आहे. गेल्या काही काळापासून ते एकाच वस्तीत राहत असल्याने हे कुटुंब एकमेकांना ओळखत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
(‘NDTV मराठी’ चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुलगी त्या मुलाला दादा (मोठा भाऊ) म्हणायची. त्याच्या राहत्या घराजवळील एका ठिकाणी ती एकटी दिसली तेव्हा त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिने तिच्या आईला ही घटना सांगितली. पीडितेच्या आईने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली आणि अल्पवयीन मुलाविरुद्ध लैंगिक छळ आणि हल्ल्याशी संबंधित एफआयआर दाखल करण्यात आला. मुलीला बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या एनजीओच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत विश्वासात घेण्यात आले. तिने घटनेची सविस्तर माहिती दिली. मुलाला ताब्यात घेण्यात आलं असून सोशल मीडियाचा प्रभावामुळे हे कृत्य केल्याचं त्याने सांगितलं.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |