कलाल समाज महासंमेलन उत्साहात संपन्न
अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे
सहस्त्र बाहू कलाल समाज संघटन, अंजनगाव सुर्जी यांचे कलाल समाज महासम्मेलन अंजनगाव तालुक्यातील माऊली आश्रम, मुऱ्हा देवी येथे रविवार १९ नोव्हेंबरला पार पडले. याप्रसंगी आमदार बळवंत वानखडे, कमलकांत लाडोळे,सुप्रसिद्ध साहित्यिक रा.गो. चवरे,न्या. वैभव फरकुंडे, भगवान डोहळे उपस्थित होते.श्री. राजराजेश्र्वर सहस्त्रबाहू अर्जुन यांच्या जयंती निमित्याने समाज बांधवांकडून वर्ग १० वी व १२ वीच्या प्रतिभावान विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच देशसेवा करणारे सैनिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी, महिला व पुरुष यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विवाह योग्य युवक -युवती परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.तसेच अनिष्ट रूढी,परंपरा यांना फाटा देत देहदान करून निसर्गावासी जयसिंगजी बिजेवार व त्यांच्या परिवाराने नवा आदर्श निर्माण केला. बिजेवार परिवाराने तेरवी न करता तेरवीचा खर्च संघटनेला देण्यात आला. तसेच श्री. गोपाल कावरे व श्री.अमोल पालेकर यांनी समाज भवनासाठी बाजार भावापेक्षा अर्ध्या किमतीत जागा उपलब्ध करून देण्याचे कबूल केले. याप्रसंगी बळवंत वानखडे कमलकांत लाडोळे रा.गो. चवरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. रा.गो. चवरे, पुणे यांनी आपले पद भूषवून समाजबांधवांना व विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा,त्याचे नियोजन कसे करावे याचे मार्गदर्शन केले.तर कलाल समाजाचा पारंपरिक भुजोरिया सण यातील सत्कार मूर्तींचे देखील सत्कार करण्यात आले. संस्थेचे सचिव तीर्थराज बिजेवार यांनी संघटना व त्याचे उद्दिष्ट,कार्य सांगून प्रास्ताविक केले.तसेच कार्यक्रमाचे संचालन प्रमोदजी पिंपळे आणि कु.रुचिता पिंपळे यांनी केले व कु. अश्विनी हेमराज बिजेवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मनोज कावरे शिवकुमार बारेवार नंदलाल कावरे रेखा पिंपळे सतीश महाजन धनराज बिजेवार केतन चौरागडे संतोष कावरे रामेश्वर कावरे दिलीप कावरे रितेश चौरे मदन कावरे शिवलाल कावरे अरुण महाजन सतीश महाजन प्रकाश कावरे देवेन चौरागडे अमोल कावरे अमर चौरे रोशन चौरागडे विजय महाजन यांनी अथक परिश्रम घेतले