हटके

प्रेयसीचे काकांशी लग्न ;  काकुला घेऊन त्याचे पलायन 

Spread the love

   जगात काही आश्चर्यकारक घटना घडत असतात. ते वाचून किंवा ऐकून ‘ ये  क्या हो रहा है भाई ‘ असे अनेकांच्या तोंडून निघते. ही घटना देखील तशीच आहे. एका तरुण आणि तरुणीचे प्रेम होते. तरुण काहीच करत नसल्याने तरुणीच्या घरच्या लोकांनी लग्नास नकार दिला. दरम्यान तरुणीचे लग्न तरुणाच्या काकांशी जमले. त्यांचा साखरपुडा ही झाला.ही बाब तरुणाला गावी गेल्यावर कळली. त्यानंतर तरुणी आणि काकांचे लग्न होऊन त्यांना मुले झाली. अश्यातच काका आणि पुतण्या एकाच ठिकाणी काम।करू लागले. आणि सोबत राहू लागले. सोबत राहत असल्याने पुन्हा  त्यांचे जुने प्रेम उफाळून आले.आणि दोघांनी चिठ्ठी सोडत पलायन केले. त्यानंतर काय घडले वाचा पुढे …..

यानंतर काकाने भरोसा सेलमध्ये तक्रार केली. पोलिसांनी तिघांनाही एकमेकांसमोर बसवून त्यांचे समूपदेशन केले आणि कौटुंबिक तिढा सुटला. काका-काकू यांनी पुन्हा संसार थाटला तर पुतण्यानेही काकाचा संसार बघता माघार घेतली.

उमेश (२६) आणि शुभांगी (२१) (बदललेले नाव) हे मूळचे मध्य प्रदेशातील बालाघाट शहरात राहतात. दोघांचेही एकमेकांवर दहावीपासून प्रेम. दोघांनाही लग्न करायचे होते. मात्र, उमेश बेरोजगार असल्यामुळे शुभांगीच्या आई-वडिलांनी उमेशला लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे उमेश कामाच्या शोधात नागपुरात आला. त्याला नागपुरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये नोकरी मिळाली. वर्षभरानंतर तो घरी आला असता शुभांगीच्या कुटुंबियांनी तिचे उमेशचे काका संजय याच्याशी लग्न ठरवले होते. दोघांचा साखरपुडाही झाला होता. उमेश आणि शुभांगी पेचात पडले. मात्र, कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून उमेशने माघार घेतली. प्रेयसी शुभांगी काकाची पत्नी म्हणून कुटुंबात नांदायला आली. मात्र, दोघांचेही प्रेमसंबंध कायम होते. त्याबाबत काका संजय आणि कुटुंबीय अनभिज्ञ होते. यादरम्यान शुभांगीला दोन मुले झाली. सर्व काही सुरळीत सुरू होते. करोना काळानंतर काका संजय आणि उमेश हे दोघेही नागपुरात एका हॉटेलमध्ये नोकरीसाठी आले. काका-काकू आणि पुतण्यासह पारडीत एकाच घरात राहायला लागले.

पळून जाऊन करायचे होते लग्न

शुभांगी आणि उमेश दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याने प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही चिठ्ठी लिहून पळ काढला. काका संजयच्या पायाखालची जमीन सरकली. दोन्ही मुलांचा विचार न करता पत्नी पळून गेल्याने तो चिंतेत पडला. मुलांसाठी तरी पत्नी परत येईल, या आशेने संजयने आठ दिवस वाट बघितली. त्यानंतर त्याने भरोसा सेलमध्ये पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे यांच्याकडे तक्रार केली.

तिघांचेही समूपदेशन आणि तिढा सुटला

पती संजय यांच्या तक्रारीवरून सीमा सूर्वे यांनी पळून गेलेल्या दोघांचेही लोकेशन काढून शोध घेतला. त्यांना भरोसा सेलमध्ये आणले. संजय दोन्ही मुलांसह तेथे पोहोचला. तिघांनाही समोरासमोर बसवून त्यांचे समूपदेशन केले. उमेशची समूजत घातली आणि शुभांगीला दोन्ही मुलांचा विचार करण्याची संधी दिली. दोघांनाही चूक उमगली. उमेशने थेट गाव गाठण्याचे ठरविले तर काका-काकूंचा पुन्हा संसार फुलला.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close