हटके

कालव्यातील पाणी कमी होताच दिसली कार आणि समोर आले भलतेच सत्य…

Spread the love
मुरैना ( मध्यप्रदेश ) / नवप्रहार डेस्क 
                 कालव्यातील पाणी कमी होताच कालव्यात एक कार दिसली. कुतूहलवश जाऊन पाहिले असता त्यात दोन सांगाडे दिसले.।त्यामुळे पोलिसांना याबद्दल कळविण्यात आले. सिहोनिया पोलीस घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी विचारपूस केली असता मृतक जवळच्या गावातील असल्याने लोकांनी कार वरून त्यांची ओळख पटवली.ते दोघे दिर आणि वहिनी असल्याचे समोर आले.
 
          पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कार मध्ये सापडलेले सांगाडे नीरज जाटव 26 आणि मिथिलेश मुकेश जाटव 32 यांचे असल्याचे समोर आले. दोघेही गुरुद्वारा येथील अंबाह येथील रहिवासी असल्याचे समजले. नीरज आणि मिथिलेश हिचा पती मुकेश हे आपसात चुलत भाऊ होते. मुकेश हा सरकारी शाळेत शिक्षक आहे. 
 
मुकेश याने फेब्रुवारी महिन्यात पत्नी मिथिलेश च्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.  नीरज  देखील त्याच दिवसापासून गायब होता. पण मुकेश च्या बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलिसांना शंका आहे. पण दोघांचे मृतदेह एकाच सीटवर आढळल्याने पोलिसांनी त्यांची हत्या झाली असावी असेही म्हटले आहे. 
           मिथिलेश आणि नीरज मागच्या चार महिन्यांपासून गायब होते. मिथिलेश च्या पती ( मुकेश) ने पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पण नीरज च्या कुटुंबीयांनी कुठलीही तक्रार दाखल केली नव्हती. कौटुंबिक बाब असल्याने बदनामी होऊ नये यासाठी कदाचित तसे केले असावे असेही समजते.पोलिस घटनेचा तपास करण्यास गुंतली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close