क्राइम

बालाजी मंगल कार्यालयात सुरु असलेल्या जुगारावर पोलिसांची धाड

Spread the love
पण चिरीमिरी घेऊन प्रकरण रफादफा
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
              रात्री गस्तीवर असलेल्या दत्तापुर पोलिसांच्या चमूने बालाजी मंगल कार्यालयात सुरु असलेल्या जुगारावर धाड टाकली असल्याचे खात्रीलायक वृत्त असून चिरीमिरी घेऊन हे प्रकरण दाबण्यात आल्याची चर्चा आहे.
            विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार अजनांसिगी रस्त्यावरील बालाजी मंगल कार्यलयात काही युवक जुगार खेळत असल्याचे रात्री गस्तीवर असलेल्या दत्तापुर ठाण्याच्या पोलीस चमुला कळल्यावर त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकल्याचे समजत आहे.
जुगारातील रक्कम आणि चिरीमिरी घेऊन प्रकरण केले रफादफा –  प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती नुसार जुगारातील अंदाजे 30 ते 40 हजाराची नगदी आणि प्रकरण निपटवण्यासाठी ‘ चिरीमिरी ‘ घेऊन गस्ती दलाने प्रकरण रफादफा केल्याचे बोलल्या जात आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close