शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांची शासन दरबारी नोंद करा पॉवर ऑफ मीडियाची तहसीदारांना निवेदनातून मागणी
अंजनगाव सर्जी, मनोहर मुरकुटे
ग्रामीण व शहरी भागातील पत्रकार जे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत मात्र त्यांना अधिस्वीकृती ओळखपत्र नाही अश्या सर्व पत्रकारांची नोंद शासन दरबारी करण्यात यावी या मागणीचे निवेदन नुकतेच (दि.९ ऑगस्ट, क्रांतीदिनी ) पॉवर ऑफ मीडिया अंजनगाव सर्जी तालुका शाखेच्यावतीने देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांना तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले. निवेदनात पत्रकारांनी म्हटले की, केली. ज्या पत्रकारांना शासनाने अद्यापही अधिस्वीकृती दिली नाही परंतु ते गेल्या १० वर्षापेक्षाही जास्त काळापासून शहरी आणि ग्रामीण भागात ते पत्रकारिता करीत आहेत अश्या सर्वच पत्रकाराची शासनाने शासनदरबारी नोंद करावी. याबाबत
अनेकदा शासनास आणि लोकप्रतिनिधींना , तहसीलदार यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली आणि याकरिता आमच्या संघटनेच्या वतीने अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर २०२० मध्ये भव्य असा मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता त्यामध्ये तत्कालीन शासनाने आश्वासन दिले होते तरीही आमच्या मागणीची दखल घेतल्या गेली नाही त्यामुळे या गंभीर बाबीकडे देशाच्या प्रथम नागरिक म्हणून आपण जातीने लक्ष देण्याची मागणी
या निवेदनातून करण्यात आली असून ही मागणी मान्य न झाल्यास याविरुद्ध तीव्र अश्या स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा पॉवर ऑफ मीडिया अंजनगाव सुर्जी येथील पत्रकार संघटनेच्या वतीने तहसीलदार यांचेमार्फत देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे याप्रसंगी तालुका अध्यक्ष मनोहर मुरकुटे ,शहराध्यक्ष प्रवीण बोके ,सचिव जयेंद्र गाडगे, अशोक पिंजरकर गजानन चांदुरकर ,उमेश काकड, गजेंद्र मंडलिक, सागर साबळे ,अनंत मोहोड ,सुनील माकोडे,मंगेश इंगळे, सचिन अब्रूक, रवींद्र वानखडे ,महेंद्र भगत श्याम कळमकर, सुजीत काठोडे ई पत्रकार ह्यावेळी उपस्थित होते.