सामाजिक

पत्रकार व वकील हे लोकशाहीचे महत्त्वाचे स्तंभ . अध्यक्ष ॲड . तुषार उबाळे .

Spread the love

 

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] –

समाजातील अंधारातील प्रश्न प्रकाशात आणणारे पत्रकार बांधव व लोकांच्या वर झालेल्या अन्यायावर न्याय दरबारे भक्कम बाजू मांडून न्याय मिळवून देणारे वकील बांधव हे लोकशाहीचे महत्त्वाचे स्तंभ आहेत, असे गौरवोदगार पारनेर वकील असोसिएशन चे अध्यक्ष ॲड . तुषार उबाळे यांनी काढले आहेत .
पत्रकारांवर सातत्याने होत असलेला अन्याय व त्यांच्या मागण्या या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही संवाद यात्रा संपन्न होत आहे . त्यानिमित्ताने पारनेर न्यायालयातील वकील संघटनेच्या कार्यालयात या संवाद यात्रेचा पोस्टर प्रकाशन करण्यात आले .
यावेळी अध्यक्षस्थानी असलेले संघटनेचे अध्यक्ष ॲड तुषार उबाळे बोलताना पुढे म्हणाले की , या संवाद यात्रेच्या माध्यमातून पत्रकारांच्या असलेल्या मागण्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे हे राज्य शासनाकडे मांडणार आहात, त्या मागण्या आपल्या पूर्ण होवोत, या साठी पारनेर वकील बार असोसिएशन अध्यक्ष या नात्याने आपणास शुभेच्छा व सर्वांच्या वतीने समर्थन देत आहे, आज वकील न्यायव्यवस्था व पत्रकार हे लोकशाहीचे मजबुत स्तंभ असुन त्यांच्या मजबुतीसाठी सर्वांनी सहकार्य करत वकील बांधव व पत्रकार बांधव यांना योग्य त्या आवश्यक सोयी सुविधा व संरक्षण मिळणे आवश्यक आहे . त्या अनुषंगाने कायदे बनने आवश्यक आहे, वकील बांधव यांच्यावर होत असलेले हल्ले असोत , वा समाजातील घडामोडी पत्रकार बांधव जीवावर उदार होऊन प्रकाशात पुढे आणत असतात .पत्रकार समाज बांधव यांचा एक आरसा म्हणुन काम करत असतात . सामाजिक व तसेच सर्व क्षेत्रातील अडचणी दुर करण्यास प्रयत्न करतात . त्यामुळे यांनाही योग्य त्या सुविधा मिळाव्यात हीच अपेक्षा व्यक्त करतो . वकील बांधव यांच्या वरील अन्याय व मागण्या यासाठी पत्रकार बांधव यांनी सहकार्य करावे व आमच्या वकील संरक्षण कायदा, आंदोलन यासाठी आपण जे सहकार्य केले , ते आपण पुढेही कराल आणि पत्रकार बांधव यांच्या समस्या सोडवण्यासाठी ही पत्रकार संवाद यात्रा नक्कीच सकारात्मक भूमिका घेईल, असा मला विश्वास वाटतो , असे ही अध्यक्ष ॲड . उबाळे यांनी व्यक्त केल्या .
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अहिल्यानगर चे जिल्हा सचिव व दैनिक पारनेर समर्थ चे संपादक यांनी प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूरच्या दीक्षाभूमी ते मुंबईतील मंत्रालय पर्यंत निघणाऱ्या पत्रकारांच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने पारनेर वकील संघटनेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल ऋण व्यक्त करून वकील बांधवांचे आभार मानले व पत्रकारांच्या या संवाद यात्रेबद्दल सविस्तर माहिती देताना सांगितले की, ही संवाद यात्रा महाराष्ट्रातील नव्हे ,तर देशातील पत्रकारांसाठीची सर्वात मोठी यात्रा संवाद आहे . या संवाद यात्रेचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे हे सक्षम पणे करत आहे . त्यांना महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधव मनापासून सहकार्य करत आहे . या निमित्ताने पत्रकारां चे असणारे प्रश्न समाजापुढे मांडून राज्य शासनाच्या मार्फत ते मार्गी लावण्यात येतील, असेही जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील शेवटी म्हणाले .
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पारनेर तालुका सह सचिव व पारनेर वकील संघटनेचे सदस्य ॲड . सोमनाथ गोपाळे , वकील संघटनेचे सचिव ॲड . अमोल औटी, ज्येष्ठ सदस्य ॲड . सुभाष औटी, श्री स्वामी समर्थ बँक चेअरमन ॲड . शेळके , ॲड . खिलारी, ॲड . औटी, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र खोसे ,उद्योजक मोहन खोसे व इतर मान्यवर उपस्थित होते .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close