क्राइम

पत्रकार असल्याचे सांगून ब्लॅकमेल करणाऱ्या आणि स्पा चालवणाऱ्या पिता पुत्राला अटक 

Spread the love

पुणे / नवप्रहार ब्युरो

                      पत्रकारितेच्या नावावर इतर सलून आई स्पा चालकांना  ब्लॅकमेल करणाऱ्या आणि स्वतः स्पा सेंटर च्या नावाखाली गैरकृत्य करणाऱ्या पिता पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे.

सिराज चौधरी (वय ५५) आणि त्याचा मुलगा वसीम हे स्थानिक भाषेतील वृत्तपत्र चालवतात आणि लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्याचा वापर करतात. या प्रकरणात पोलिसांनी वसीम आणि एका महिलेसह इतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. वसीमकडे २४ थाई स्पा असलेल्या मालमत्तेची मालकी आहे.

सिराजला ठाणे पोलिसांनी एका पार्टीमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. दुसरीकडे, वसीम पत्रकाराच्या नावाखाली इतर स्पा आणि ब्युटी सलूनना भेट देतो आणि स्पाय कॅमेऱ्यानं व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यांच्या मालकांना ब्लॅकमेल करतो. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलिसांनी सोमवारी रात्री कारवाई करत २४ थाई स्पामधून दोन महिलांची सुटका केली. महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. बाणेर पोलिसांनी रात्री ८ वाजेच्या सुमारास या स्पावर छापा टाकला. हा स्पा टाउन बिल्डिंगमध्ये आहे.

नागालँडची राहणारी ज्योती देवी (वय ३८), जबलपूरची रहिवासी अमनगिरी गोसवानी (वय २३), स्पा ऑपरेटर दीपक चव्हाण आणि वसीम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिताच्या कलम १४३, ३(५) आणि अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close