शैक्षणिक

शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे व ग्रॅन्ड मराठा फाउंडेशन मुंबई यांचा संयुक्त उपक्रम.

Spread the love

 

 

1000 गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
छत्रपती शिवरायांना अनोखी शैक्षणिक मानवंदना.

राजेश सोनुने /  ता. प्र. पुसद
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्यभिषेकाच्या औचित्याने शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे व ग्रॅन्ड मराठा फाउंडेशन मुंबई यांचा संयुक्तपणे शैक्षणिक उपक्रम राबवित छत्रपतींना अनोखी मानवंदना दिली.शिवरायांच्या विचारांचं पूजन व्हावं व त्यांची समाजाप्रती असलेली संवेदनशीलता जपली जावी या उद्देशाने ठाणे, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील अतिमागास भागातील गरजवंत १०००विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारे साहित्य पुरविण्यात आले.
छत्रपती शिवरायांच्या ३५० व्या राज्यभिषेकाचा उत्सव जगभर मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला.शिवरायांचे समाजातील अठरापगड जाती व वचिंताबद्दलचे कार्य अद्वितीय असेच आहे.रयत सुखी राहिली पाहिजे, त्यांच्या जिवनमान उंचावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले पाहिजे.सोबत पर्यावरण संवर्धनही झालं पाहिजे ही महाराजांची दूरदृष्टी होती.
त्याच विचाराने प्रेरित होऊन शिवप्रभा ट्रस्ट व ग्रॅन्ड मराठा फाउंडेशनने आदिवासी, शेतमजूर व दुर्गम भागातील जनतेच्या मुलांना शिक्षणदृष्टी प्रदान करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला.मागास भागातील अनेक मुलं शैक्षणिक साहित्या अभावी शाळेत जात नाहीत.तर काही जात असली तरी गुणवत्तेत मागे पडतात.आणि मग शिक्षणापासून हळूहळू बाजुला फेकली जातात.सदर मुलांना शिक्षण प्रवाहात ठेवण्यासाठी त्यांना प्रेरणा म्हणून सदर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील ७०० गरजवंत विद्यार्थी तर चंद्रपूर जिल्ह्यातील २०० गरजवंत विद्यार्थी व ठाणे ठाणे जिल्ह्यातील १०० गरजवंत विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली आहेत.
या शैक्षणिक कीट मध्ये स्कूल बॅग,वर्षभर पुरतील अशा वह्या,रंगपेटी,चित्रकला वही, पेन्सिल,खोडरबर,शाॅपनर,स्केलपट्टी ,कंपासपेटीसह विविध दर्जेदार साहित्य विद्यार्थ्यांना भेट देण्यात आले.हे रंगबिरंगी व उपयुक्त साहित्य बघुन विद्यार्थी हरखून गेलेत.याचबरोबर दररोज शाळेत येण्याचे वचनही प्रसंगी या चिमुकल्यांनी दिले हे विशेष.
गतवर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्तही दोन्ही संस्थेने एकत्र येत १००० विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप केले होते.त्या उपक्रमाचे फलीत गुणवत्ता संवर्धनातून दिसून आले.करीता याहीवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनाच्या औचित्याने केलेल्या शैक्षणिक किटचे वाटपाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी ठाणे जिल्ह्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष अमोल साईनवार,सचिव शिशिर मांड्या,विश्वस्त सुगंधा साईनवार,चंद्रपूर करिता संजय साईनवार तर ग्रँड मराठा फाउंडेशन कडून नवीन आडे, शिवप्रभा सदस्य सोहम नरवाडे व पुसद करिता शिवप्रभा परिवार सदस्य गजानन जाधव,अमित बोजेवार,पंकज पाल महाराज,अनंता भाऊ चतुर, प्रभाकर पाटील,पंजाब भाऊ ढेकळे दिग्विजय गायकवाड व उमरखेड करिता परिवार सदस्य नागेश मिरासे तसेच सर्व लाभार्थी शाळांचे मुख्याध्यापक व अनेक शुभचिंतकांनी परीश्रम घेतले आहेत,संस्थेने सर्व शुभचिंतक व दात्यांचे आभार मानले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close