सफाई कामगार संगीता चव्हाण याच्या वरील निलंबन मागे घ्या.–
गांधी चौक परिसरातील नागरिकांनी दिले मुख्याधिकारी याना निवेदन.
अरविंद वानखडे
यवतमाळ – नगरपरिषद येथील गांधी चौक परिसरातील स्थायी सफाई कर्मचारी संगीता सुभाष चव्हाण या अनेक वर्षापासून या परिसरामध्ये सफाई कामगार असून आरोग्य विभागांनी दिलेल्या परिसराची स्वच्छता करतात त्यांनी केव्हाही आपल्या कामात काम चुकारपणा केला नसून परिसरातील नागरिकांमध्ये व त्या परिसराततील व्यवसायिक दुकानदारांना या सफाई कामगाराची माहिती आहे. मात्र त्यांच्यावरती झालेल्या निलंबनाच्या कारवाई विरोधात नगरपरिषद मुख्याधिकारी यांना कारवाई मागे घेण्याकरिता निवेदन दिले आहे.
संगीता चव्हाण
त्यांच्या कामाची नियमित पद्धत पाहून परिसरातील नागरिकांना सफाई कामगार परिचित आहे.
त्यांच्या कामामुळे त्या परिसर नियमित स्वच्छता राहत असून संगीता चव्हाण आपल्या परिसरात साफसफाई नित्याने करीत असतात. त्यांच्या कामाच्या वेळेत त्या परिसरातच नियमित असतात. मात्र त्यांच्यावरती हेतूपूर्वक निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.त्या जर कर्तव्यावर कामचुकार करीत होत्या तर त्यांना आरोग्य निरीक्षक यांच्याद्वारे एकही सूचना देण्यात आल्या नाही.२३ ऑगस्ट रोजी स्वच्छतेच्या कामावरती साफसफाई करीत होत्या कामकाजाचे प्रत्यक्ष पाहणी केल्याचे सांगून संगीता सुभाष चव्हाण सफाई कर्मचारी यांना पूर्वसूचना न करता त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली.हा एक प्रकारे त्यांच्यावरती व त्यांच्या कामावरती अन्याय झाल्याचे मत गांधी चौक परिसरातील नागरिक व व्यवसायिकांनी केली असून त्यांच्या वरती झालेल्या अन्यायाकरिता संपूर्ण परिसरातील नागरिक एकवटले आहे. त्यांच्या या कारवाईच्या विरोधात मुख्याधिकारी नगरपरिषद यवतमाळ यांना निवेदन दिले असून जिल्हाधिकारी यवतमाळ तसेच विभागीय आयुक्त अमरावती यांना सुद्धा परिसरातील नागरिकांनी निवेदन पाठविले आहे. त्यांना परत कामावरती घेण्यात यावे असे त्यांनी निवेदन देऊन त्यांच्या कामाबद्दलची त्यांची पोचपावती नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे मुख्याधिकारी न.प.यवतमाळ
यांनी केलेली ही निलंबनाची कारवाई मागे घेऊन त्यांना नियमित करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी आपल्या निवेदनातून केली आहे.