जो आवडी सर्वाला तोचि आवडे देवाला..!!!शुभांगीताई साबळे
मृत्युननंतरच्या जुन्या परंपरेला फाटा देत कोणतेही सोपस्कार न करता अधुरे स्वप्न केले पूर्ण
अंजनगाव सुर्जी. मनोहर मुरकुटे
विदर्भ संघ मुंबईचे संस्थापक तथा विदर्भातील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते स्व. सुधाकरराव उर्फ अण्णासाहेब साबळे याचे अल्पशा आजाराने मुंबई येथिल खाजगी रुग्णालयात नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच मुंबईत स्थायिक असलेल्या विदर्भ वासीयानवर मोठा दुखाचा डोंगर कोसळला हजारो विदर्भ वासीयांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली. अण्णा साहेबांना लहाण पंणा पासुनच समाज कार्यकरण्याची आवड असल्याने त्यांच्या साबळे कुंटूबियानी त्यांची दशक्रिया,तेरवि असे कोणतेही सोपस्कार न करता अंजनगाव येथिल स्व दिगंबरराव पेटकर आश्रम शाळेतील आदिवासी विध्यार्थान करीता खेळणे भेट देऊन त्यांचे अधुरे स्वप्न पुर्ण करण्याचा मानस केला होता त्या निमित्य नुकताच २१/१२ /२४ ला स्व. दिगंबरराव पेटकर आश्रम शाळेत स्मृतिषेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रविण पेटकर तर उदघाटक सौ शुंभागीताई साबळे महिला शिवसेना संपर्क प्रमुख चंद्रपुर ( ठाकरे गट ) सुरेशदादा साबळे जेष्ठ पत्रकार. मुख्याध्यापिका सौ नयनाताई हाडोळे. चंदाताई वानखडे उधोजिका. अजिंक्य साबळे गव्ह कन्ट्राक्टर. दिलिपराव साबळे. हे प्रामुख्याने मंचावर उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ वर्षो पेटकर तर आभार प्रदर्शन जयेंद्र गाडगे यांनी केले. शुभांगी ताई बोलत असतानां त्यांनी अण्णासाहेबांच्या समाज कार्याचा लेखाजोगा उपस्थींताण समोर मांडत असतानां कणं कणं करूणी कोटी केले. नं खर्चीले स्वहीता साठी बाबा दुःखी जनते साठी. याच गाडगे बाबाच्या विचाराने प्रेरीत होऊन अण्णा साहेब आयुष्यभर गोरगरीब जनते करीता काम करीत राहले अखेर अल्पशा आजाराने त्यांची प्राणजोत मावळली म्हणु आम्ही साबळे परिवार जुण्या परंपरेला फाट देत त्यांच अधुर स्वप्न पुर्ण करण्याच्या सात्वीक हेतुने हे समाज कार्य करण्याचा मानस करीत असल्याचे सांगितले. या प्रसंगी कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता शाळेचे अधिक्षक अमोल हाडोळे. मुकेश वानरे. चक्रधर दुधरकर. विठ्ठल पखाले. मधुर जाधव यांनी महत्वाची भुमिका बजावली