सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जिजाऊ ब्रिगेड ने नोंदवला निषेध
तहसीलदार यांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाई ची मागणी
दर्यापूर / प्रतिनिधी
मसाजोग तालुका केज जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची दिनांक ९ डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेचा जिजाऊ ब्रिगेड तालुका दर्यापूर कडून जाहीर निषेध करण्यात येत आहे.सदरील हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे.या हत्येमागे एक मोठी बलाढ्य शक्ती आहे. ज्यामुळे समाजातील निरपराध लोकांचा बळी जात आहे.या प्रवृत्तीला वेळीच आवर घातला नाही तर समाजाचा पोलीस यंत्रणेवरील व न्यायपालिकेवरचा विश्वास संपून जाईल.तसेच परभणी येथील आंदोलन कर्ते व संविधान रक्षक adv. सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील पोलीस कोठडीत मृत्यू झाला.या दोन्ही प्रकरणातील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने करण्यात येत आहे.
तेव्हा जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष शिवमती शिल्पाताई लोडम, जिजाऊ ब्रिगेड तालुका सचिव शिवमती सारिका ताई तिडके, जिजाऊ ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष अनिता ताई गावंडे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष शिवमती शिल्पाताई गावंडे जिजाऊ ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष शिवमती कविताताई भांगे जिजाऊ ब्रिगेड ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष शिवमती जयश्रीताई चव्हाण, जिजाऊ ब्रिगेड तालुका संघटक शिवमती संध्या ताई साबळे, जिजाऊ ब्रिगेड सदस्य भावनाताई देवगिरी आदी उपस्थित होते.