हटके

स्टॅमिना वाढविण्याच्या गोळ्या घेऊन करत होता तसले काम ; झाला मृत्यू 

Spread the love

मुंबई  / नवप्रहार डेस्क 

                       शरीर संबंध ठेवताना परमोच्च आनंद यावा यासाठी त्याने स्टॅमिना वाढविणाऱ्या गोळ्या घेतल्या. आणि अल्पवयीन मुली सोबत शारीरिक संबंध ठेवताना त्याचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या डी बी मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.

संजयकुमार तिवारी असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याचे वय 41 वर्षे होते. एका अल्पवयीन मुलीसोबत शारिरीक संबध करताना व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आले आहे. शारिरीक संबध ठेवण्याआधी संजय याने काही गोळ्यांचे प्राशन केल्याचे तपसात समोर आले आहे. मुलीसोबत शरीरसंबंध ठेवत असताना संजय बेशुद्ध पडले. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मुलीने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना दिली त्यानंतर घडलेला प्रकार समोर आला आहे. मुलीच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर संजय याने मुलीला मदत केली होती.

लॉजवर नेमकं काय घडले?

पोलिसांनी नोंद केलेल्या माहितीनुसार, 2 ऑक्टोंबर रोजी अल्पवयीन पीडित मुलीला मुंबईत फिरण्याच्या नावाखाली आणून संजय तिला घेऊन ग्रँटरोड येथील सुपर हॉटेलमध्ये गेला. त्या ठिकाणी मुलीचे वय कमी असल्याने बनावट आधारकार्ड देत दोघांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. मुलीसोबत शरिरसंबध ठेवण्यापूर्वी संजयने काही गोळ्यांचे सेवन केले. शरिरसंबधावेळी संजय बेशुद्ध पडल्यानंतर मुलीने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना बोलवले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना बोलवले. पोलिसांनी संजयला जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

दरम्यान पोलिसांनी मृत आरोपी संजय विरोधात अल्पवयीन मुलीवर अत्यचार केल्याच्या आरोपाखाली पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत. मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी आणि कृती करण्यापूर्वी त्याने कोणती टॅब्लेट घेतली होती की नाही, हे शोधण्यासाठी ते वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहेत. अहवाल आल्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळाली.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
1
+1
0
+1
2
+1
1
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close